महाराष्ट्र

maharashtra

परवागनी केंद्र सरकार देत असले तरी, चिपी विमानतळ राज्य शासनाचे - माजी मंत्री दीपक केसरकर

By

Published : Sep 8, 2021, 8:03 PM IST

Chipi Airport is of State Government react Kesarkar
चिपी विमानळ राज्य शासनाचे प्रतिक्रिया केसरकर

केंद्र सरकार परवानग्या देत असले, तरी चिपी विमानतळ राज्य शासनाचे आहे. विमान उडणार, हा आनंदाचा प्रसंग आहे. त्यात कोणी विघ्न आणण्याचे काम करू नये, असा पलटवार आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता केला. दीपक केसरकर यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली.

सिंधुदुर्ग - केंद्र सरकार परवानग्या देत असले, तरी चिपी विमानतळ राज्य शासनाचे आहे. विमान उडणार, हा आनंदाचा प्रसंग आहे. त्यात कोणी विघ्न आणण्याचे काम करू नये, असा पलटवार आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता केला. दीपक केसरकर यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विमानतळाच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.

हेही वाचा -नारायण राणेंनी उगाच फुशारक्या मारू नये - खासदार विनायक राऊत

पंतप्रधांनानी सुद्धा त्यांना योग्य त्या सुचना द्याव्यात

केसरकर म्हणाले, अनेक वर्षे रखडलेल्या विमानतळावरून विमान उडणार ही आनंदाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत त्याला चांगला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मात्र, काही लोक केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहे. अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य त्या सुचना द्याव्यात. विमानतळाच्या परवानग्या केंद्राचा विषय असला, तरी विमानतळ राज्य शासनाचा आहे. यासाठी गणपतीपूर्वी परवानगी मिळणे गरजेचे होते, मात्र दुर्दैवाने ती परवानगी मिळाली नाही.

कोट्यावधींची गुंतवणूक असलेला प्रकल्प रेडीत येणार

कोट्यावधीची गुंतवणूक असलेला मोठा प्रकल्प रेडी येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विरोधकांना कळले तर त्यालाही विरोध करतील, त्यामुळे आत्ता काही सांगत नाही. चर्चा सुरू आहे, मात्र हा प्रकल्प झाल्यास त्याचा फायदा परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे, असा विश्वास आमदार दिपक केसरकर यांनी आज व्यक्त केला. दरम्यान माझी राजकीय संघर्षाची भूमिका होती, परंतु अशा गोष्टीमुळे विकास बाजूला राहणार असल्यामुळे मी आता माझा निर्णय बदलला आहे. संघर्ष आणि राजकारण करीत बसण्यापेक्षा या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यात मी मंत्री नसलो तरी माझ्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी काम करीत आहे, असे केसरकर म्हणाले.

हेही वाचा -शिक्षक दिनानिमित्त सिंधुदुर्गात शिक्षकांची सरकारी रुग्णालयाला अनोखी भेट

ABOUT THE AUTHOR

...view details