ETV Bharat / state

शेवटच्या टप्प्यातील 'महा'मुंबईतील १० जागा ठरणार निर्णायक; मुंबई, ठाणे, कल्याणचा गड कोण राखणार? - Mumbai Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 10:30 PM IST

Updated : May 9, 2024, 4:09 PM IST

Mumbai Lok Sabha Election 2024 : राज्यात तीन टप्प्यांचं मतदान संपलं असून १३ मे ला चौथ्या टप्प्यासाठी आणि २० मे रोजी शेवटच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी मतदान होणार आहे. या १३ जागांमध्ये महामुंबईतील १० जागांचा समावेश असून या १० जागांमध्ये मुंबईतील सर्व ६ जागा त्याचबरोबर ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या जागांचा समावेश आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी या १० जागा अतिशय प्रतिष्ठेच्या असून शेवटच्या टप्प्यात प्रचारादरम्यान महामुंबईत या दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा कस लागणार आहे.

Greater Mumbai Election
महामुंबईतील उमेदवार (Reporter)

महा मुंबईतील निवडणूक स्थितीविषयी बोलताना अ‍ॅडवोकेट वैजनाथ वाघमारे (Reporter)

मुंबई Mumbai Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. आतापर्यंत निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी २४ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. उर्वरित २४ जागांपैकी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी ११ जागांवर आणि अंतिम पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १३ जागांवर मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, अंतिम टप्प्यात मतदान होणाऱ्या १३ जागांमध्ये महा मुंबईतील १० जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम या ६ जागांसोबत ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर या जागांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना 'न भूतो... ' दुभंगली. एकनाथ शिंदे यांना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्य बाण' मिळणार, यावर शिक्कामोर्तब झालं. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नव्या नावानिशी मतदारांना सामोरं जावं लागणार आहे. खरी शिवसेनाल कुणाची? या प्रश्नाचं उत्तर राज्यातले मतदार ठरवणार आहे. ४ जून रोजी, मतमोजणीच्या दिवशी हे मतदार 'त्यांच्या मनातली शिवसेना' निश्चित करणार आहेत.

पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने उतरले आहेत. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमध्ये एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करण्यास भाजपाला यश आलं. तिथून भाजपाकडून डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा, शिवसेना (तेव्हाची अविभाजीत), शिवसेना (एकनाथ शिंदे) असा प्रवास करत राजेंद्र गावित पुन्हा भाजपात प्रवेश करत स्वतःचं राजकीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. पालघरची लढाई अटीतटीची होणार आहे. कारण पालघर मधून उद्धव ठाकरे यांनी भारती कामडी यांना उमेदवारी दिली असून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भिवंडीमध्ये भाजपाने विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली असून ते सुद्धा हॅटट्रिक करण्याच्या उर्मीत तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कडून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं तुलनेनं सोपं आव्हान आहे.

मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात अशा आहेत लढती :

मुंबई दक्षिण
अरविंद सावंत (उबाठा) × यामिनी जाधव ( शिंदे)

मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील (उबाठा) × मिहीर कोटेचा ( भाजप)

मुंबई उत्तर पश्चिम
अमोल कीर्तिकर (उबाठा) × रवींद्र वायकर (शिंदे)

मुंबई दक्षिण मध्य
अनिल देसाई (उबाठा) × राहुल शेवाळे (शिंदे)

मुंबई उत्तर मध्य
वर्षा गायकवाड ( काँग्रेस) × उज्वल निकम (भाजप)

मुंबई उत्तर
भूषण पाटील (काँग्रेस) × पियुष गोयल (भाजप)

मुंबईत निवडणुकीच्या रिंगणात हे आमदार आणि खासदार : मुंबई मधून ठाकरे गटाचे अरविंद सावंत तर शिंदे गटाचे राहुल शेवाळे हे दोन विद्यमान खासदार पुन्हा निवडणूक लढवत असून भाजपाचे आमदार मिहीर कोटेचा, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड तर एकनाथ शिंदे गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि आमदार यामिनी जाधव असे एकूण चार आमदार लोकसभेसाठी आपलं नशीब आजमावत आहेत. या महामुंबईतील १० जागांविषयी बोलताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते एडवोकेट वैजनाथ वाघमारे म्हणाले की, "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महायुतीची लाट असून महामुंबईतील या १० जागासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. देशाच्या, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या सर्व जागा महत्त्वाच्या आहेत."

ती 'महाभकास' आघाडी असल्याची टीका : शिवसेना दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात आहेत. भाजपा आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात आहे. हे जरी असलं तरी आम्हाला आणि आमच्या सहयोगी पक्षाला पूर्ण खात्री आहे की, मुंबईतील सर्व जागा आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू. उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील संजय राऊत असतील किंवा महाविकास आघाडीतील इतर नेते असतील यांनी फक्त महायुतीला बदनाम करण्याचं आणि त्यांना शिव्या देण्याचं काम केलं आहे. आता जनतेला फक्त विकास हवा आहे. महाविकास आघाडीकडे आता कुठलेही मुद्दे नसून ती 'महाभकास' आघाडी झाली आहे. म्हणून मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील," असा विश्वास एडवोकेट वैजनाथ वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. मोठ्या थाटामाटात 'जागतिक गाढव दिन' साजरा, गाढवांसाठी महिलांनी केलं खाद्य जमा - World Donkey Day
  2. आमदार रवी राणांनी फुकटात नेल्या 70 हजार विटा; आमदारांवर अशी वेळ का आली? - Allegation On Ravi Rana
  3. फिलिस्तीनचे समर्थन करणारी पोस्ट लाईक केली अन् गेली नोकरी, मुख्याध्यापिकेवर निलंबनाची कारवाई - Palestine Supporting Matter
Last Updated :May 9, 2024, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.