महाराष्ट्र

maharashtra

आमदार नितेश राणे व राकेश परब यांची समोरासमोर चौकशी

By

Published : Feb 3, 2022, 4:27 PM IST

Updated : Feb 3, 2022, 4:47 PM IST

आमदार नितेश राणे यांचे खासगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावेळी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलीस समोरासमोर चौकशी ( Interrogation of MLA Nitesh Rane and Rakesh Parab ) करत आहेत.

Face to face interrogation MLA Nitesh Rane
आमदार नितेश राणे चौकशी कणकवली पोलीस

सिंधुदुर्ग -आमदार नितेश राणे यांचे खासगी सचिव राकेश परब हे देखील कणकवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावेळी नितेश राणे आणि राकेश परब यांची कणकवली पोलीस समोरासमोर चौकशी ( Interrogation of MLA Nitesh Rane and Rakesh Parab ) करत आहेत.

हेही वाचा -पुण्याहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसला वैभववाडी करूळ घाटात लागली आग

नितेश राणे यांचे शिवसैनिक संतोष परब खुणी हल्ल्यातील मुख्य आरोपी पुणे येथील सचिन सातपुते याच्यासोबत राकेश परबच्या मोबाईलवरून संभाषण झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राकेश परब यांच्या मोबाईलवर सचिन सातपुते यांचे एकूण 38 कॉल आढळून आले आहेत. पोलीस तपासात ही बाब निष्पन्न झाल्यानंतर राकेश परब यांच्या मोबाईलवरून नितेश राणे यांचे सातपुते याच्यासोबत संभाषण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतचा तपास कणकवली पोलीस या दोघांनाही समोरासमोर बसवून करत आहेत. यावेळी जे बोलणे झाले ते नेमके कोणत्या मोबाईलवरून झाले याची चौकशी देखील यावेळी करण्यात येत आहे.

नितेश राणेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणे हे कणकवली न्यायालयात काल शरण आले होते. नितेश राणे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज काल मागे घेण्यात आला. त्यानंतर ते कणकवली न्यायालयात शरण आले होते. न्यायालयासमोर शरण आल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून म्हणणे मागवले. त्यानंतर राणेंचे वकील व सरकारी वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. सरकारी वकिलांनी राणेंना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आमदार नितेश राणे यांचा राज्य सरकारवर आरोप

दरम्यान कणकवली न्यायालयात हजर होण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर आरोप केला. सरकार मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत मी कणकवली न्यायालयात हजर होत आहे, असे ते यावेळी म्हणाले.

सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना

कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हा संघर्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. तर राणे विरुद्ध शिवसेना असा सामना या निवडणुकीमध्ये रंगला होता. मात्र, या निवडणुकीत अखेर राणे यांना मोठे यश मिळाले. यामध्ये राणे गटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. तसेच, शिवसेनेच्या हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळात कोकणामध्ये पुन्हा नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.

फेटाळला होता अटकपूर्व जामीन

सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यासोबतच 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर राहण्याची मुदत दिली होती. त्यामुळे, नितेश राणे काल जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी आमदार नितेश राणे यांची बाजू मांडली होती.

नेमके काय झाले होते त्यावेळी ?

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. संतोष परब हे मोटरसायकलवरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

हेही वाचा -Goa Assembly Election 2022 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

Last Updated : Feb 3, 2022, 4:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details