ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

author img

By

Published : Feb 2, 2022, 9:35 AM IST

नाना पटोले दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. मंगळवार (दि. 1 फेब्रुवारी)रोजी संध्याकाळी त्यांनी पणजीतील नाराज उमेदवार उदय मदकाईकर यांची भेट घेतली. (Nana Patole on a two-day visit to Goa) यामध्ये त्यांनी मदकाईकर यांची समजूत घातली आहे. दरम्यान, मदकाईकर यांनीही आपली बाजू मांडली आहे. तसेच, पटोले काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर

गोवा (पणजी) - काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. मंगळवार (दि. 1 फेब्रुवारी)रोजी संध्याकाळी त्यांनी पणजीतील नाराज उमेदवार उदय मदकाईकर यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी मदकाईकर यांची समजूत घातली आहे. दरम्यान, मदकाईकर यांनीही आपली बाजू मांडली आहे. (Congress state president Nana Patole ) तसेच, पटोले काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

प्रतिक्रिया

उत्पल आमच्या सोबत येतील

उदय मडकईकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. (Goa Assembly Election 2022) ते पुढे देखील काँग्रेस सोबत राहतील. त्यांनी पणजीत अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही. उत्पल आमच्या सोबत येतील यासाठी मडकईकर यांच्या मार्फत आमचे प्रयत्न राहतील असही पटोले यावेळी म्हणाले आहेत.

गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काही प्रमोद सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती.

गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, भाजप आपल्या स्वार्थी राजकारणासाठी गोव्याचा वापर करत आहे. यासाठी ते गोव्याचा बळी देत आहे. याचा काँग्रेस निषेध करत आहे. ( Congress Candidate Announced For UP Election 2022 ) सरकारचा पत्रव्यवहार कर्नाटकच्या बाजूचा दिसत आहे. म्हादईचा प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या धोरणाने लोक त्रासले आहेत, ज्यामुळे ते त्यांना भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमातही सहभागी होऊ देणार नाहीत, असे चित्र दिसते.

पर्यटन खात्यातील भ्रष्टाचार या सर्वांचा एकत्रित परिणाम गोव्याच्या पर्यटनावर

गोव्यातील घटत्या पर्यटकांच्या संख्येविषयी बोलताना चोडणकर म्हणाले, गोव्यातील पर्यटक कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. () ज्यामध्ये केंद्र सरकारचे चुकीचे आर्थिक धोरण आहे. (Candidate List For Goa Assembly Election) तसेच गोवा सरकारकडे योग्य असे, पर्यटन धोरणही नाही. तसेच पर्यटकांना वाचवण्यासाठी जीवरक्षक नाहीत, पर्यटन खात्यातील भ्रष्टाचार या सर्वांचा एकत्रित परिणाम गोव्याच्या पर्यटनावर होत आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पात सामान्य लोकांच्या अपेक्षांचा चक्काचूर, सामना'तून मोदी सरकारवर प्रहार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.