ETV Bharat / state

पुण्याहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसला वैभववाडी करूळ घाटात लागली आग

author img

By

Published : Feb 3, 2022, 9:43 AM IST

Updated : Feb 3, 2022, 11:47 AM IST

पुण्याहून गोव्याकडे निघालेल्या एका लक्झरी बसला वैभववाडी कुरुळ घाटात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मनीष ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने अचानक पेट घेत बस जळाल्याची घटना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभववाडी करूळ घाटात एडगांव घाडीवाडी नजीक ही घटना घडली आहे. यात कोणीही जखमी नाही, तसेच वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला आहे.

The fire broke out when the luxury bus left for Goa
पुण्याहून गोव्याला निघालेल्या लक्झरी बसला लागली आग

सिंधुदुर्ग - पुण्याहून गोव्याकडे निघालेल्या एका लक्झरी बसला वैभववाडी कुरुळ घाटात आग लागल्याची घटना समोर आली आहे. मनीष ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसने अचानक पेट घेत बस जळाल्याची घटना आज (गुरुवार) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. वैभववाडी करूळ घाटात एडगांव घाडीवाडी नजीक ही घटना घडली आहे.

ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी बचावले आहेत. एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच सर्व प्रवाशांना बसमधून उतरवून सुरक्षित स्थळी नेले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुण्याहून गोव्याला निघालेल्या बसला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी

मनीष ट्रॅव्हल्स (जीए ०३ /डब्लू २५१८) ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात होती. करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजीक बस आली असता बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या ही घटना लक्षात येताच त्याने बस थांबवली. बसमधील प्रवासी खाली उतरले. बसमधून धुराचे लोळ येऊ लागले आणि क्षणात बसने अधिकच पेट घेतला.

घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली. दरम्यान महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही तासात कुडाळ येथील अग्निशमन बंब दाखल झाला. आग विझवण्यात आली आहे. या घटनेनंतर एडगांव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही तासांनी वाहने मार्गस्थ करण्यात आली.

Last Updated :Feb 3, 2022, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.