महाराष्ट्र

maharashtra

Satara News: शेतमजूर महिलेसह दोन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, सहा जण बचावले

By

Published : May 17, 2023, 10:11 PM IST

शेततळ्यात पोहायला गेलेल्या शेतमजूर महिलेसह दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील हेळगाव-पाडळी गावात घडली आहे. सुदैवाने सहा जण या घटनेत बचावले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Satara News
दोन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू,

सातारा: पाडळी-हेळगावमध्ये डोंगरालगत पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे. शेजारील शेतात शेतमजूर महिला काम करत होत्या. उन्हामुळे दहा शेतमजूर महिला शेततळ्यात पोहायला गेल्या. शेततळ्यातील दोरीच्या आधाराने त्या सर्वजणी शेततळ्यात पोहण्यासाठी उतरल्या होत्या. शोभा नितीन घोडके, रागिणी रामचंद्र खडतरे, वैष्णवी गणेश खडतरे, अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.




दोरी तुटली अन् तिघी बुडाल्या : पोहता न येणाऱ्यांनी शेतळ्यात बांधलेल्या दोरीला पकडले. दोरीवर जास्त प्रमाणात भार पडून दोरी तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्वजण पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. शेततळ्यात पोहणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बुडणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक महिला आणि दोन मुलींना वाचविण्यात अपयश आले.



सहा जणांना वाचविण्यात यश:महिला आणि दोन मुली शेततळ्यात बुडाल्यानंतर आरडाओरडा झाला. त्यामुळे मदतीला आलेल्यांनी सहा जणांना कसेबसे शेततळ्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. तर मृतदेह कराड उपजिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली. एकाच वेळी तीन महिलांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

ABOUT THE AUTHOR

...view details