महाराष्ट्र

maharashtra

सातारा : गजा मारणे टोळीशी संबंधित 13 जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

By

Published : May 1, 2021, 8:40 PM IST

गुरुवारी पोलिसांनी पुणे-महाबळेश्वर रस्त्यावर वाईजवळ भीमनगर तपासणी नाक्यावरून गजा मारणे टोळीशी संबंधित 13 जणांना अटक केली होती. या 13 जणांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

police custody 13 people in satara
सातारा : गजा मारणे टोळीशी संबंधित 13 जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

सातारा-गजा मारणे टोळीशी संबंधित 13 जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी पोलिसांनी पुणे-महाबळेश्वर रस्त्यावर वाईजवळ भीमनगर तपासणी नाक्यावर या लोकांना ताब्यात घेतले होते.

प्रतिमहिना 25 लाखाच्या खंडणीची केली होती मागणी -

वाईत जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे प्रवीण दिनकरराव शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिंदे यांचे साडू लक्ष्मण मारुती पार्टे रा. तायघाट ता. महाबळेश्वर यांचे नचिकेता हायस्कूल एकास चालविण्यास दिले होते. त्यावेळी या हायस्कूल चालकामुळे पुण्यातील एका व्यक्तीची ओळख झाली होती. यावेळी संबंधिताने गजा मारणे टोळीसाठी काम करत असल्याचे सांगितले होते. यानंतर या संबंधिताने प्रवीण शिंदे यांना फोन करून 'वेळोवेळी तुम्ही पाचगणी - महाबळेश्वर परिसरात जमिनीचे मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत. याबद्दल तुम्हाला गजा मारणे टोळीसाठी महिन्याला 25 लाख रुपये द्यावे लागतील' असे सांगितले होते.

जीवे मारण्याची दिली धमकी -

आज संबंधित गुंडाने आपल्या टोळीतील साथिदारांसह वाईतील घरी जाऊन पैशाची मागणी केली व पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. यामुळे भीतीने प्रवीण शिंदे यांनी पोलिसांशी संपर्क साधून या टोळीबाबत पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी गजा मारणे टोळीशी संबंधित वाघू तुकाराम हळंदे रा. जकातनाका, वारजे गोरक्षनाथ माणिक शिळीमकर, अमोल बंडू शिळीमकर, विशाल चंद्रकांत शेळके, सौरभ तानाजी शिळीमकर, सचिन अंकुश शिळीमकर रा. तांभाड ता.भोर, बालाजी कमलाकर कदम, मंदार सुरेश बांदल, राहूल रामकृष्ण कळवणकर तिघेही रा. दत्तवाडी सिंहगड रोड, रोहन रमाकांत वाघ रा. विंग ता.खंडाळा, तुषार बाळासाहेब बदे, आनंद तुळशीदास यादव, विक्रम विलास समुद्रे तिघेही रा. दत्तवाडी यांना ताब्यात घेतले.

तीन गाड्या जप्त -

पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांकडून दप्तर अहवाल मागविला होता. त्यांच्याकडून 19 लाख रुपये किंमतीच्या तीन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय मोतेकर अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - 'लस सुरूवातीला परदेशात देण्याची काहीच गरज नव्हती'

ABOUT THE AUTHOR

...view details