महाराष्ट्र

maharashtra

साताऱ्यात नाईट कर्फ्यूच्या पहिल्याचदिवशी ढिलाई

By

Published : Feb 23, 2021, 12:14 PM IST

कोरोनाचे मध्यंतरी घटलेले आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाने 'नाईट कर्फ्यू' लावला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली. महामार्गांवरील हॉटेल, रेस्टॉरंट वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात य़ेत आहेत.

first day of night curfew in Satara
साताऱ्यात नाईट कर्फ्यूच्या पहिल्याचदिवशी ढिलाई

सातारा -लाॅकडाऊनच्या काळात कर्फ्यू लोकांच्या अंगवळणी पडला आहे. 'काही नाही होत, चालतं' या स्वभावामुळे कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. नाईट कर्फ्यूदरम्यान लोक रस्त्यावर शतपावली करताना, रस्त्यावर गप्पा मारताना बसलेले पहायला मिळाले. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेला 'कुठे जाऊ अन् कुठे नको' असे झाले.

प्रतिक्रिया

जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17 टक्क्यांवर -

कोरोनाचे मध्यंतरी घटलेले आकडे पुन्हा वाढू लागले आहेत. 1 फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाने 'नाईट कर्फ्यू' लावला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली. महामार्गांवरील हॉटेल, रेस्टॉरंट वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात य़ेत आहेत. दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी लोकांना माहिती असूनही काही लोक रस्त्यावर फिरताना दिसत होते.

प्रत्येकाकडे कारण -

नाईट कर्फ्यूदरम्यान पोलिसांची वाहने पेट्रोलिंग करत होती. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे रस्त्यांवर पोलीस बळाची संख्या कमी होती. पोवई नाक्यावर शहर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे जातीने हजर होते. कर्फ्यूत बाहेर फिरताना सापडलेले वाहनचालक काही ना काही कारण सांगताना दिसत होते. दुचाकीवर फिरणारेही घरी निघालोय, बाहेरून जेवून निघालोय, अशी कारणे देत होती.

पोलीस कारवाया वाढवणार -

रोज ५० लोकांना विनामास्क दंड करण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक मांजरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. विनामास्क, तसेच विनाकारण कर्फ्यूमध्ये फिरणाऱ्या लोकांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - रेखा जरे हत्यांकांड : बाळ बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

ABOUT THE AUTHOR

...view details