महाराष्ट्र

maharashtra

Women's Day 2022 : देशातील पहिल्या सैनिक स्कूलमध्ये प्रथमच 10 मुलींची बॅच; वाचा खास स्टोरी

By

Published : Mar 8, 2022, 10:24 AM IST

सैनिकी पेशात कायम मुलांना पाहतो. (History of Women's Day) सिमेवर लढण्यापासून अंतर्गत सुरक्षेलाही सैनिकांच काम करतात. सातारा जिल्ह्याची कायम सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख राहिली आहे. आता इथे सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलमध्ये प्रथमच १० मुली दाखल झाल्या आहेत. (International Women's Day) देशातील पहिल्या सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरु झाले आहे. मुलांच्या खांद्याला खांदा लावून या दहा मुलींनी 'छोरियां छोरों से कम ना है' हाच संदेश महिला दिनानिमित्त दिला आहे.

सैनिक शाळेतील विद्यार्थी
सैनिक शाळेतील विद्यार्थी

सातारा - सैनिकांचा जिल्हा म्हणून लौकिक असलेल्या सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलमध्ये प्रथमच १० मुली प्रवेशप्रक्रीया पार पाडून दाखल झाल्या आहेत. (Women's Day theme) देशातील पहिल्या सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरु झाले आहे.मुलांच्या खांद्याला खांदा लावून या दहा मुलींनी 'छोरियां छोरों से कम ना है' हाच संदेश महिला दिनानिमित्त दिला आहे. (Happy Women's Day) आज जागतिक महिला दिनाच्या पुर्वसंध्येला आमचे प्रतिनिधी शैलेन्द्र पाटील यांनी सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी बातचित केली.

ईटीव्ही भारतची खास स्टोरी

६३० विद्यार्थ्यांत १० मुली

संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने (२३ जून १९६१)रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरु झाली. (Women's Day significance) या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ पर्यंत शिक्षण दिले जाते. (first soldier school In India) ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे. (soldier school in satara) निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.

सैनिक शाळा सातारा

भविष्यात मुलींच्या जागा वाढतील

सैनिक स्कूलचे उपप्राचार्य विंग कमांडर बी लक्ष्मीकांत य‍ांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले, आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय गेल्या वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत प्रथमच खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वीत सात विद्यार्थीनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होउ शकते.

सैनिक शाळा सातारा

६११ मुलींतून झाली निवड

सैनिक स्कूलमधील दहा जागांसाठी ६११ विद्यार्थीनींनी प्रवेश परिक्षा दिली होती. त्यातून ही निवड झाली. (२०२२-२३)या पुढील शैक्षणिक वर्षासाठी १ हजार ४५० मुलींनी दहा जागांसाठी अर्ज केले आहेत. त्यातूनही दहा मुली सैनिक स्कूलसाठी निवडल्या जातील. १२ वी नंतर दहाच्यादहा मुली एनडीएसाठी पात्र ठरतील, यासाठी आम्ही तयारी सुरु केली असल्याचे विंग कमांडर बी. (International Women's Day 2022) लक्ष्मीकांत य‍ांनी सांगितले. या मुली दाखल झाल्यापासूनचे निरिक्षण सांगताना ते म्हणाले, खरंतर मुलामुलींमध्ये आम्ही फरक करत नाही. परंतु आमच्याकडे शिकणाऱ्या काही मुलांमध्येल घराकडे जाण्याची ओढ दिसून येते. मात्र, आम्हीं या मुली शाळेत दाखल झाल्यापासून पहातोय, त्या प्रचंड आत्मविश्वासाने आणि उत्साहाने इथल्या शैक्षणिक उपक्रमांत सहभागी होताना दिसत आहेत, असेही ते म्हणाले.

सैनिक शाळेतील विद्यार्थी

प. बंगाल, बिहार अन् महाराष्ट्राच्या मुली

अंशिका शामराव ननावरे, श्रावणी दिपक वाघ, सिद्धी रोहन रावखंडे, सिद्धी संदीप गंगतिरे, याना शंकर तोटावार, पियुशा जितेंद्र चव्हाण, रिथा महेंद्र धोडी (महाराष्ट्र), अदिती संजयकुमार कश्चप (बिहार), उत्तरा जयंत भवाल, इशा कुमारी (प. बंगाल) या दहा मुलींना सैनिक स्कूलच्या निवासी शाळेत प्रथमच प्रवेश मिळाला आहे. वैभवी रोड्डे, प्र‍ाक्षा सोनार व श्रेया अगंद या तीन स्टाफ मेंबरच्या मुली या शाळेत शिकतात परंतू त्या अनिवासी आहेत.

सैनिक शाळेतील विद्यार्थी

हेही वाचा -मुलगाच आसावा का? वायंडिंगच्या कामात मुलगी झाली वडिलांचा आधार; वाचा खास स्टोरी

ABOUT THE AUTHOR

...view details