महाराष्ट्र

maharashtra

सातारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला आरोपीला 20 वर्षांची शिक्षा

By

Published : Feb 2, 2021, 10:47 AM IST

दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा तसेच 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे आणि दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे.

accused-of-raping-minor-girl-sentenced-to-twenty-years
सातारा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला आरोपीला २० वर्षांची शिक्षा

सातारा -दोन वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने 20 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा सुनावली आहे. नंदन बापू अडागळे (46) असे शिक्षा मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.

वकीलांची प्रतिक्रिया

काय आहे प्रकरण -

24 जून 2018 रोजी पीडित मुलगी तिच्या घरात एकटी असताना अडागळे याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला होता. त्यानंतर या प्रकरणी पीडित मुलीने 25 जून 2018 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम 3 व 4 नुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. चव्हाण, अर्चना दयाळ यांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान न्यायालयासमोर आलेले साक्षीपुरावे व पीडितेचा जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवले. त्याला गुन्ह्याबद्दल २० वर्षे सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details