महाराष्ट्र

maharashtra

सांगली: मॅटसाठी पैलवान उतरले रस्त्यावर, पंचायत समितीसमोर केले ठिय्या आंदोलन

By

Published : Feb 9, 2022, 10:00 PM IST

विविध मागण्यांसाठी चक्क पैलवानांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. मिरजेच्या पंचायत समिती कार्यालयासमोर कुस्तीगिरी खेळाडूंनी आंदोलन करत सराव करण्यासाठी मंजूर झालेले 'मॅट' तातडीने देण्याची मागणी केली आहे.

wrestlers at Panchayat Samiti office Miraj
पैलवान मॅट मागणी मिरज

सांगली - विविध मागण्यांसाठी चक्क पैलवानांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. मिरजेच्या पंचायत समिती कार्यालयासमोर कुस्तीगिरी खेळाडूंनी आंदोलन करत सराव करण्यासाठी मंजूर झालेले 'मॅट' तातडीने देण्याची मागणी केली आहे. तसेच, मागणीकडे दुर्लक्ष केल्यास पंचायत समिती कार्यालयात कुस्ती आखाडा करण्याचा इशारा कुस्ती खेळाडूंनी दिला आहे.

माहिती देताना पैलवान नितीन शिंदे

हेही वाचा -Sangli Crime News : आष्ट्यात 80 वर्षीय आईचा गळा आवळून खून, नंतर मुलाची आत्महत्या

सरावाच्या मॅटसाठी पैलवानांचे आंदोलन

मिरज तालुक्यातल्या बीड येथील दिग्विजय कुस्ती केंद्र या ठिकाणी नवोदित आणि भावी कुस्तीपटूंसाठी माजी सभापती गीतांजली कणसे यांनी 15 व्या वित्त आयोगामधून दोन वर्षांपूर्वी 3 लाख 71 हजार रुपयांचा निधी कुस्ती प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या मॅटसाठी मंजूर केला आहे. मात्र, दोन वर्षांपासून मिरज पंचायत समिती प्रशासन व ठेकेदारांकडून मॅट देण्यास टोलवाटोलवी करण्यात येत आहे. केवळ उडवाउडवीचे उत्तर वारंवार देण्यात येत आहेत, त्यामुळे संतप्त झालेल्या पैलवानांनी नवोदित कुस्तीपटूंना घेऊन मिरज पंचायत समिती गाठली आणि निषेध म्हणून पैलवानांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत आंदोलन केले.

जोपर्यंत मॅट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा पैलवानांनी दिला. अखेर प्रभारी सभापतींनी गुरुवारपर्यंत मॅट देण्याचे आश्वासन संबंधित आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, त्याचबरोबर गुरुवार पर्यंत मॅट मिळाला नाही तर, पुन्हा थेट पंचायत समितीच्या कार्यालयात कुस्तीचा आखाडा होईल, असा इशारा देखील संतप्त पैलवानांनी दिला.

हेही वाचा -दोन चिमुरड्यांसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details