महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडीला तयार; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद नाही -प्रकाश आंबेडकर

By

Published : Sep 21, 2022, 4:06 PM IST

Etv Bharat

राज्यातील आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडीचा प्रस्ताव दिलाय, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आला नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सांगली - प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रातील भाजप सरकारसह राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशाची राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. नेहरुंनी कबुतर सोडली होती. मोदींनी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं आंबेडकर म्हणाले.

व्हिडिओ

दोन महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेकडून सरकारी संपत्ती विकण्यावरून ज्या पद्धतीची टिप्पणी करण्यात आली, ती पाहता आपण दोन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींवर टीका करताना सांगितलं होतं, की एखाद्या दारुड्याला दारुसाठी पैसे मिळाले नाही की, तो घरातली भांडी विकायला सुरुवात करतो, तशाच पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दारुड्याप्रमाणे वर्तन असल्याचे सांगितले होते. याला आता रिझर्व बँकेकडून दोन महिन्यांपूर्वी पुष्टी देण्यात आलेली आहे, अशा शब्दात नरेंद्र मोदींवर आंबेडकरांनी निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर बोलताना आंबेडकर म्हणाले, भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठं चालला आहे, आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे, अशी टीका आंबेडकर यांनी राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर केली आहे. तसेच श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी सर्व प्रयत्न केले. श्रीमंत मराठ्यांबरोबर गरीब मराठ्यांची यापुढे युती फार काळ चालणार नाही, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details