महाराष्ट्र

maharashtra

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विट्यासह खानापूर नगरपंचायतींची उल्लेखनीय कामगिरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

By

Published : Jul 24, 2019, 7:08 PM IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ स्पर्धेत पश्‍चिम विभागातील नॉन अमृत प्रवर्गात विटा शहराने गुणानुक्रम १४ वा तर स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ स्पर्धेत नॉन-अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक पटकाविला आहे.

मुख्यमंत्री विटा नगरपालिकेचा सन्मान करताना

सांगली -स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील विटा नगरपालिका आणि खानापूर नगरपंचायतीने उल्लेखनीय काम केले आहे. विटा पालिकेने देशात चौथा येण्याचा बहुमान मिळवला आहे. तर खानापूर नगरपंचायतीने राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. याबद्दल मुंबई शानदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विटा नगरपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नगरपालिकेचा सन्मान करताना मुख्यमंत्री

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ स्पर्धेत पश्‍चिम विभागातील नॉन अमृत प्रवर्गात विटा शहराने गुणानुक्रम १४ वा तर स्वच्छ सर्वेक्षण- २०१९ स्पर्धेत नॉन-अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर चौथा क्रमांक पटकाविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील या उल्लेखनीय कामाबद्दल २३ जुलैला मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेतील पारितोषिक वितरण करुन विटा नगरपालिकेचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास विटा पालिकेच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, स्वच्छता अभियानाचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, आरोग्य सभापती अ‍ॅड. विजय जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या सोहळ्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर, नगरविकास संचालक मथ्थू कृष्णन यांच्या उपस्थितीत होती.

मागील वर्षभरात विटा पालिकेकडून शहरात स्वच्छता मोहीम जोरदारपणे राबवली होती. याला विटेकर नागरिकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्याचाच परिणाम म्हणून विटा नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सन्मान झाला आहे. तसेच याच सोहळ्यात जिल्ह्यातल्या खानापूर नगरपंचायतचाही स्वच्छ सर्वेक्षण मधल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षणअंतर्गत २०१८-१९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान खानापूर नगरपंचायतीने मिळवला होता. त्याच बरोबरच देशातील शहरातून २१ वा क्रमांक मिळवला आहे. रस्ते विकासाच्या बाबतीत खानापूर शहराने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. नगरपंचायतीने अडीच वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे शहरात केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details

संबंधित बातम्या