महाराष्ट्र

maharashtra

सांगलीच्या गिरजवडे गावातील घरांवर दगडांचा वर्षाव, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

By

Published : Nov 19, 2019, 8:43 AM IST

Updated : Nov 19, 2019, 10:55 AM IST

शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील घरांवर मागील सात दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत असून गावात भीतीचे वातावण पसरले आहे.

दगडांमुळे कोलांचे झालेले नुकसान

सांगली- शिराळा तालुक्यातील गिरजवडे या गावातील घरांवर मागील सात दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत आहे. यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समाज माध्यमांवर उलट-सुलट चर्चा सुरू असून अंधश्रद्धा पसरवू नये, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

माहिती देताना ग्रामस्थ आणि अंनिसचे सचिव


सांगलीच्या शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे मागील सात दिवसांपासून गावातील घरांवर दगडांचा वर्षाव होत आहे. यामध्ये सहा सात घरांच्या कौलांची चाळण झाली आहे.रात्रीच्या वेळी घरावर दगड पडत असल्याने कौलारू फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे गावातील नागरिक भीतीच्या छायेत वावरत असून संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. रात्र झाली की गावातील लोकांना भीतीने धडकीच बसते आहे. यासाठी गावातील गावकरी रात्रभर गावाला पहारा देत आहेत. तरी सुद्धा घरावर कोण दगड मारते हे समजू शकले नाही.


गावातील देवीचा कोप झाल्यानेच घरावर दगड पडत असल्याचे पोस्ट समाज माध्यमांवर फिरत आहेत. याबाबत येथील युवकांना विचारले असता, असे काही नसून लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून, अशा काही पोस्ट पसरवू नये, असे म्हणणे आहे. दगड फेकीच्या घटनांबाबत गावातील नागरिकांनी शिराळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस तपास करत आहेत.


याबाबत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे यांच्याकडून जाणून घेतले असता, हा प्रकार मानव निर्मित असून याला भानामतीचे प्रकार म्हणतात. ही अंधश्रद्धा असून लोकांनी न घाबरता आमच्या संपर्क करावा, हे कारस्थान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

हेही वाचा - भंगार कपाटात सापडलेले 7 तोळे सोन्याचे दागिने केले परत, भंगारवाल्याचे सर्वत्र कौतुक

Last Updated : Nov 19, 2019, 10:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details