महाराष्ट्र

maharashtra

सांगलीत खुल्या पद्धतीने बेदाणा सौद्यांना सुरुवात, २०० रुपये उच्चांकी दर

By

Published : Jun 10, 2020, 3:10 PM IST

बेदाणा सौद्यांसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बेदाणा सौदे बंद पडले होते. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यंदा बेदाण्याची निर्मिती केली होती.

raisins start selling
सांगलीत खुल्या पद्धतीने बेदाणा सौद्यांना सुरुवात

सांगली - खुल्या पद्धतीने बेदाणा सौदा आजपासून सांगलीत सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी पार पडलेल्या या सौद्यांमध्ये 200 रुपये प्रतिकिलो दर बेदाण्याला मिळाला आहे. ऑनलाईन बेदाणा सौद्यांना मिळणारा अल्प प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांनी खुल्या सौद्यांची परवानगी मागितली होती. त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खुल्या बेदाणा सौद्यांना सुरुवात झाली आहे.

सांगलीत खुल्या पद्धतीने बेदाणा सौद्यांना सुरुवात

बेदाणा सौद्यांसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बेदाणा सौदे बंद पडले होते. तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी यंदा बेदाण्याची निर्मिती केली असून, सुमारे दीड लाख टन बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये सध्या पडून आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ही ई-नाम (ऑनलाईन ) पद्धतीने बेदाणा सौद्यांना परवानगी दिली होती. त्यानुसार सांगली बाजार समितीच्या आवारात ऑनलाईन बेदाणा सौद्यांना सुरुवात झाली. मात्र, याला अल्प प्रतिसाद मिळत होता. त्याचबरोबर बेदाण्याला दरही कमी प्रमाणात मिळत होता, तसेच त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर व्यापारी, शेतकरी आणि अडत्यांनी येणाऱ्या अडचणी आणि मिळणारा अल्प प्रतिसाद त्यामुळे खुल्या पद्धतीने बेदाणे सौदे करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सांगली जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.

आजपासून सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर खुल्या पद्धतीने बेदाणा सौद्यांना सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी 1500 गाड्यांची आवक झाली होती. तर २५ व्यापाऱ्यांनी यावेळी सहभाग नोंदवत सोशल डिस्टन्स आणि कोरोनाची खबरदारी घेऊन या ठिकाणी बेदाणा सौदे पार पाडले. त्यामध्ये पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्यास सरासरी २०० रुपये इतका दर मिळाला आहे. तर, ऑनलाईन सौंद्यात बेदाण्याला १५० रुपयेपर्यंत उच्चांकी दर मिळाला होता. मात्र, खुल्या पद्धतीने पार पडणाऱ्या सौद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बेदाण्याला आता अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत यावेळी व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details