महाराष्ट्र

maharashtra

बहिणीला सोन्याची अंगठी का दिला म्हणून मुलाकडून बापाचा खून; जत तालुक्यातील घटना

By

Published : Oct 9, 2020, 10:09 PM IST

बहिणीला सोन्याची अंगठी दिली म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना जत तालुक्यातील बिळूर येथे घडली आहे. याप्रकरणी जत पोलिसांत संशयित आरोपीवर गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास जत पोलिस करत आहे.

Father's murder by son for giving sister a gold ring in jat in sangli
बहिणीला सोन्याची अंगठी का दिला म्हणून मुलाकडून बापाचा खून; जत तालुक्यातील घटना

जत (सांगली)- बहिणीला सोन्याची अंगठी का दिली म्हणून मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना जत तालुक्यातील बिळूर येथे घडली आहे. भीमू सत्यप्पा जाबगोंड (80) असे मृत वृद्धाचे नाव, तर सदाशिव भिमु जाबगोंड असे आरोपी मुलाचे नाव आहे.

जत तालुक्यातील बिळूर येथील भीमू जाबगोंड यांच्या डोक्याला ५ ऑक्टोबर रोजी गंभीर मार लागला होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते; परंतु डोक्याला जबर मार असल्याने त्यांना 6 ऑक्टोबर रोजी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना 7 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन आहवाल भीमू जाधव यांना फिट येत असल्याने डोक्यावर पडून झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

दरम्यान याप्रकरणी मुलानेच वडिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी करून मारले असल्याची फिर्याद संशयित आरोपी मुलाची बहीण महानंदा राजेंद्र कोरे यांनी दिली आहे. वडिलांनी मला सोन्याच्या अंगठ्या दिल्याने संशयित आरोपी सदाशिव जाबगोंड याने त्यांच्याशी 5 ऑक्टोंबर रोजी भांडण केले होते. या भांडणात त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाल्याने आणि अतिरक्तस्त्रव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मुलानेच त्यांचा खून केल्याची फिर्याद महानंदा कोरे यांनी दिली आहे. याप्रकरणी 9 ऑक्टोबर रोजी जत पोलिसांत आरोपी सदाशिव भीमु जाबगोंड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details