महाराष्ट्र

maharashtra

उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न का पूर्ण करू शकत नाही - नारायण राणे

By

Published : Jan 10, 2021, 7:12 PM IST

बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे का पूर्ण करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही. कारण त्यांना नामांतरापेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटते, अशी टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

why uddhav thackeray is not fulfilling balasaheb's dream said narayan rane in ratnagiri
उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न का पूर्ण करत नाहीत - नारायण राणे

रत्नागिरी -औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून भाजप नेते खासदार नारायण राणेंनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते स्वप्न उद्धव ठाकरे का पूर्ण करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे.

नारायण राणे यांची प्रतिक्रिया

औरंगाबादच्या नामकरणापेक्षा त्यांना खुर्ची वजनदार वाटते -

औरंगाबादला संभाजी राजेंचे नाव द्यावे, असे बाळासाहेबांनी सागितले होते. हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. बाळासाहेबांचे हे स्वप्न उद्धव ठाकरे का पूर्ण करत नाहीत, नामांतरापेक्षा त्यांना खुर्ची वजनदार वाटते. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर मध्ये करण्याची ताकद शिवसेनेत नाही. त्यांना आपली सत्ता टिकवण्यामध्ये जास्त रस आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

हेही वाचा - मित्रासाठी थेट ऑस्ट्रेलियातून प्रचार! जळगावातील डांभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीची सोशल मीडियावर चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details