महाराष्ट्र

maharashtra

Ramdas Kadam Resigned : शिवसेना नेते रामदास कदम यांचा राजीनामा; ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केल्याचा आरोप

By

Published : Jul 18, 2022, 7:25 PM IST

शिवसेनेला धक्का शिवसेना ( Shiv Sena ) नेते रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा ( Ramdas Kadam resigned ) दिला आहे. शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम उद्धवजी ( Uddhav Thackeray ) आपल्याकडून कधीच झालं नाही. तसेच ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत असल्याचा आरोप त्यांनी राजीनामा पत्रात केला आहे.

Resignation of Ramdas Kadam
रामदास कदम यांचा राजीनामा

रत्नागिरी - शिवसेना नेते रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा ( Ramdas Kadam resigned ) दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला एकामागून एक धक्के बसत आहे. या आगोदर जिल्ह्यातील 2 आमदार यापूर्वीच एकनाथ शिंदे गटात ( Eknath Shinde group ) गेल्याने शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का बसला होता. त्यातच आता आणखी एक राजकीय भूकंप कोकणात ( Political crisis in Shiv Sena ) झाला आहे. शिवसेना नेते रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नव्हती, शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम उद्धवजी आपल्याकडून कधीच झालं नाही. तसेच गेल्या ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

रामदास कदम यांचा राजीनामा
काय म्हटलं आहे राजीनाम्यामध्ये ?शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती . मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही. हे मला पहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला, माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले. विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले. मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही टिका केली, किंवा पक्षावर काही बोलले, तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकले नसल्याचे रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा -Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; आठ जणांची ओळख पटली

तोंड दाबून बुक्क्यांचा मार -मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे. २०१९ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress ) सोबत सरकार बनवत होतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत संघर्ष केला. राष्ट्रवादी, काँग्रेस सोबत तुम्ही युती करु नका. ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही. याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे . शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. म्हणून मी आज " शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देत आहे.

हेही वाचा -NEET परीक्षेला बसलेल्या विद्यार्थिनींनी अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले; विद्यार्थीनीची डीवायएसपीकडे तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details