ETV Bharat / bharat

Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

author img

By

Published : Jul 18, 2022, 5:31 PM IST

Updated : Jul 19, 2022, 9:48 AM IST

मध्यप्रदेशातील नर्मदा नदीवर एसटी बसचा भीषण अपघात झाला ( Maharashtra Bus Accident ) आहे. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc Bus Fall Into Narmada River 13 Dead ) आहे. त्यातील बारा जणांची ओळख पटली असून, बचाव कार्य सुरु आहे.

Maharashtra Bus Accident
Maharashtra Bus Accident

इंदूर - मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc Bus Fall Into Narmada River 13 Dead ) आहे. या अपघातानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारकडून बचाव कार्य सुरु आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढला असून, यातील 12 जणांची ओळख पटली आहे.

धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर नदी - इंदूर-अमळनेर ही बस इंदूर येथून अमळनेरकडे रवाना झाली होती. त्यात सकाळी 10.00 ते 10.30 च्या दरम्यान मध्यप्रदेशातील खलघाट आणि ठिगरीमधील नर्मदा नदीच्या पुलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. खरगोन येथे ही बस नर्मदा नदीत कोसळली आहे. हा पूल धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बस नदीत कोसळल्याने चक्काचूर झाली होती.

  • An ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the bus tragedy in Dhar, Madhya Pradesh. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi

    — PMO India (@PMOIndia) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
मध्यप्रदेशात नर्मदा नदीत झालेला बसचा अपघात

राष्ट्रपतींनी केल्या संवेदना व्यक्त - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत, असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केलं आहे.

  • मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेला अपघात ही अतिशय दुःखद घटना असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीची घोषणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बस अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून स्थानिक प्रशासन जखमींना आवश्यक त्या सेवा पुरवत असल्याचे ट्विट त्यांनी केले. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख, तर अपघातातील जखमींना 50 हजारांच्या मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • धार, मध्य प्रदेश में हुए बस हादसे में अनेक यात्रियों के हताहत होने से गहरा दुःख हुआ है। इस दुर्घटना में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के प्रति मेरी हार्दिक संवेदनाएं। मैं घायल हुए लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।

    — President of India (@rashtrapatibhvn) July 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांकडून 10 लाखांची मदत - या अपघातात झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्याच्या परिवहन खात्याकडून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तर, अपघातातील जखमींवर राज्य सरकारतर्फे तातडीने उपचार मिळवण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाती, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.

Maharashtra Bus Accident
मध्यप्रदेशातील बस अपघातात मृत झालेल्यांची नावे

मुख्यमंत्री शिंदेंची शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा - या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

महामंडळकडून नियंत्रण कक्ष स्थापन - या अपघाता संदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. या अपघाताबाबत माहितीसाठी ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर एसटी महांडळतर्फे कार्यान्वित करण्यात आला आहे.

वाहकाने एनवेळी त्यांचा निर्णय रद्द केला अन्... - ज्या बसचा अपघात झाला, त्या ड्युटीसाठी वाहक प्रकाश चौधरी जात होते. मात्र, ही ड्युटी करण्यासाठी अमळनेर डेपोतील वाहक मनोज पाटील आग्रही होते. पण, ऐनवेळी त्यांनी त्यांचा निर्णय रद्द केला. आज ( 18 जुलै ) सकाळी जेव्हा या बसच्या अपघाताची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळाली तेव्हा सर्वांना धक्का बसला. तर, मनोज पाटील यांच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत 'ईटिव्ही भारत'ने मनोज पाटील यांच्याशी संवाद साधला. तेव्हा पाटील यांना अश्रू अनावर झाले. 'दैव बलवत्तर म्हणून आज मी जिवंत. मात्र, आपले दोन सहकारी आपल्याला सोडून गेले याचं अतीव दु:ख झालं आहे.

अपघातातील मृतांची नावे -

  1. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक)
  2. प्रकाश चौधरी (वाहक)
  3. निंबाजी आनंद पाटील
  4. कमलाबाई आनंद पाटील
  5. चेतन गोपाल जांगिड
  6. जगन्नाथ हेमराज
  7. सैफुद्दीन अब्बास
  8. अरवा मूर्तजा
  9. विशाल सतीश बेहरे
  10. कल्पना विकास ऊर्फ गुलाबराव पाटील
  11. रुख्मणीबाई जोशी
  12. अविनाश परदेशी

मृतांच्या नातेवाइकांना 16 लाखांची आर्थिक मदत - मध्यप्रदेश राज्य सरकारने मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पंतप्रधान मोदींनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय ज्यांची ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे बचावकार्यावरही परिणाम होत असून, प्रत्येक स्तरावर बचाव आणि शोधाचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा - ST Bus Accident Maharashtra : महाराष्ट्रात लालपरीचे आत्तापर्यंत झालेले दहा मोठे अपघात!

Last Updated :Jul 19, 2022, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.