ETV Bharat / bharat

NEET परीक्षेला बसलेल्या विद्यार्थीनींना अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले; विद्यार्थीनीची डीवायएसपीकडे तक्रार

author img

By

Published : Jul 18, 2022, 5:31 PM IST

Updated : Jul 18, 2022, 8:00 PM IST

केरळमध्ये NEET परीक्षेला बसलेल्या महिला विद्यार्थीनींनी तक्रार केली की, त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्शन स्टेजवर त्यांचे अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले ( asked to remove their underwear ) गेले. कोल्लम जिल्ह्यातील आयुर येथील मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थीनीने डीवायएसपी कोट्टारक्करा यांच्याकडे तक्रार दाखल केली. ( kollam neet exam girls underwear inspection issue )

kollam neet exam girls underwear inspection issue
विद्यार्थीनीची डीवायएसपीकडे तक्रार

कोल्लम ( केरळ ) : केरळमध्ये NEET परीक्षेला बसलेल्या महिला विद्यार्थिनींनी तक्रार केली की, त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्शन स्टेजवर त्यांचे अंतर्वस्त्र काढण्यास सांगितले ( asked to remove their underwear ) गेले. कोल्लम जिल्ह्यातील आयुर येथील मार्थोमा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थीनीने डीवायएसपी कोट्टारक्करा ( DYSP Kottarakkara ) यांच्याकडे तक्रार दाखल केली. ( kollam neet exam girls underwear inspection issue )

परीक्षेनंतर अंडरवियर्स कार्टन्समध्ये एकत्र आढळल्या : काल 17 रोजी जुलै देशव्यापी NEET परीक्षा झाली. अंडरवेअर काढून आत प्रवेश दिला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. एका विद्यार्थीनीने पोलिसांकडे तक्रार केली. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी परीक्षेनंतर अंडरवियर्स कार्टन्समध्ये एकत्र टाकलेले आढळले.

महाविद्यालयाने आरोप नाकारला - विद्यार्थीनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे परीक्षा नीट लिहिता आली नाही. याबाबत पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवला. दरम्यान, महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आरोप नाकारला आहे. त्यांनी बाहेरील एजन्सीद्वारे फ्रिस्किंग आणि बायोमेट्रिक तपासणी केली गेली, असे म्हटले आहे.

राजस्थानात हिजाबमुळे नाकारला होता प्रवेश - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे रविवारी देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यावेळी कोटाच्या दादाबारी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या मोदी कॉलेज सेंटरमध्ये रविवारी ड्रेस कोडवरून वाद झाला. चार मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब परिधान करून केंद्रात आल्या होत्या, त्यांना पोलिसांनी गेटवरच रोखले. मात्र विद्यार्थिनींनी हिजाब काढण्यास नकार दिला. पोलिसांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले आणि ड्रेस कोडचा हवाला दिला, तरीही विद्यार्थींनी ते मान्य केले नाही. नंतर त्यांच्याकडून परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यास ती स्वत: जबाबदार असेल असे लेखी घेण्यात आले. यानंतर विद्यार्थिनींना फक्त हिजाब घालण्याची परवानगी देण्यात आली.

वाशिममध्ये ही वाद - मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय केंद्रावर रविवार दि. 17 जुलैला NEET चा पेपर घेण्यात आला. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी पेपर दिला, मात्र मुस्लिम विद्यार्थिनींना चेहरा व हॉल टिकिट दाखविल्या नंतर ही हिजाब व बुरखा काढण्यास सांगण्यात आले असल्याचा आरोप मुस्लिम विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी केला आहे. या प्रकरणी वाशिम पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत असे नमूद आहे की, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात NEET चा पेपर घेण्यात आला होता. मात्र, या विद्यार्थ्यांसह इरम मोहम्मद जाकीर व अरिबा समन गझनफर हुसैन यांच्या सोबत केंद्रातील प्रशासकीय अधिकारी व सदस्यांशी गैरवर्तन केले व ते म्हणाले की बुरखा काढा नाही तर कात्रीने कापावं लागेल. एवढंच नव्हे तर भर रसत्यात हिजाब व बुरखा काढायला लावला गेलं असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - Controversy Over Dress Code : मोदी कॉलेजमध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थींनीना NEET परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; नंतर दिली परवानगी

Last Updated : Jul 18, 2022, 8:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.