महाराष्ट्र

maharashtra

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे 53 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

By

Published : Apr 27, 2020, 7:39 AM IST

महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या कामोठे येथील 53 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज आणखी तीन नवीन कोरोनाबाधित रूग्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. हे तिन्ही रूग्ण मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत.

police dead due to corona in panvel
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे 53 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पनवेल(रायगड) - महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या कामोठे येथील 53 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज आणखी तीन नवीन कोरोनाबाधित रूग्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आढळले आहेत. हे तिन्ही रूग्ण मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत.

ज्या कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यावर कामोठ्यातील एमजीएम रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यांचे आज निधन झाले आहे. ते मुंबई येथे कामावर जाण्यासाठी दररोज कामोठे ते सीएसटी असा बसप्रवास करीत असत, त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी अथवा प्रवासादरम्यान कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. संबंधित पोलीस कर्मचारी आधीच कॅन्सरवर उपचार घेत होते.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनामुळे 53 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू


रविवारी 26 एप्रिलला पनवेल महापालिकाहद्दीत तीन नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कामोठे येथील 51 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून ही व्यक्ती मुंबईमध्ये बेस्टच्या बसेस वर चालक म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पनवेलमधील 50 वर्षीय महिला या राजेवाडी, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खारघर येथील 43 वर्षीय आणखी एक व्यक्तीला कोरोना कोरोनाची लागण झाली असून ही व्यक्ती मुंबईत सी.ए. म्हणून काम करीत आहे. त्यांनाही कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details