महाराष्ट्र

maharashtra

मोहोपाड्यात गादी दुकानाला आग; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By

Published : Jan 1, 2021, 9:52 AM IST

खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथे एका गादी दुकानाला आग लागली. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमा झाला आहे. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

Fire
आग

रायगड - खालापूर तालुक्यातील मोहोपाडा येथील मरीआई मंदिराजवळ असलेल्या गादी बनवण्याच्या दुकानाला आग लागली. मध्यरात्री लागलेल्या या आगीत एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. गोपाल (वय ३७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, गणेश हनुमंत राऊत (वय ४०) गंभीर जखमी आहेत. त्यांना नावडे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोहोपाड्यात गादी दुकानाला आग

कापसामुळे भडकली आग -

मोहोपाडा येथील मरीआई मंदिरा जवळील इमारतीमध्ये एका गाळ्यात कापसची गादी बनवण्याचे दुकान आहे. दुकानात काम करणारे गोपाळ आणि गणेश हे रात्री आपले काम आटोपून झोपी गेले होते. मात्र, मध्यरात्री अचानक दुकानातील कापसाला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने गोपाळचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश हा गंभीर जखमी झाला आहे.

अग्निशामक दलाने विझवली आग -

आगीची घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. दुकानात कापूस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. जखमी गणेश याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रसायनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details