महाराष्ट्र

maharashtra

महाडकरांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी - मंत्री आदित्य ठाकरे

By

Published : Jul 29, 2021, 7:22 PM IST

Updated : Jul 29, 2021, 7:32 PM IST

महाड शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आधी आरोग्य तपासणी या कॅम्पमध्ये जाऊन करावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

रायगड -महाडमध्ये आलेल्या पुराने शहरात अस्वच्छता पसरली असून आधी नागरिकांचे जीव वाचविणे गरजेचे आहे. महाडमध्ये आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केले असून नागरिकांनी आधी आपल्या आरोग्याची तपासणी तातडीने करून घ्यावी, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाडकरांना केले आहे. महाडमध्ये लवकरच एनडीआरएफ कॅम्प होणार असून त्याबाबत ऑर्डर काढण्यात आली आहे. पण त्याआधी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
महाड पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी पूरग्रस्तांना अन्न धान्याचे वाटपही करण्यात आले. पूर ओसरला असून सगळीकडे माती आणि चिखल साचला आहे. प्रशासनाच्या मार्फत स्वच्छता मोहीम हातात घेतली आहे. यासाठी सर्व महानगरपालिकेची यंत्रणाही महाडमध्ये आली आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. महाड शहरात ठिकठिकाणी आरोग्य तपासणी कॅम्प सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आधी आरोग्य तपासणी या कॅम्पमध्ये जाऊन करावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
Last Updated : Jul 29, 2021, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details