महाराष्ट्र

maharashtra

Garmal Forest of Raigad District : गरमाळच्या जंगलात सापडला मृतदेह

By

Published : Jan 22, 2022, 3:56 PM IST

गारमाळच्या जंगलात ( Garmal Forest ) खोल दरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वारावरण पसरले होते. अनेक संस्थांनी एकत्र मोहीम राबवत हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून मृत व्यक्ती हैदराबाद येथील असून पुढील तपास सुरू आहे.

मृतदेह काढताना
मृतदेह काढताना

रायगड - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या गारमाळच्या जंगलात खोल दरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वारावरण पसरले होते. अनेक संस्थानी एकत्र मोहीम राबवत हा मृतदेह बाहेर काढला असून, मृत व्यक्तीची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आले आहे.

तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश -रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या गारमाळच्या घनदाट जंगलात जवळपास दोन हजार फूट खोल दरीत एका व्यक्तीचा मृतदेह कामगारांना दिसला. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने ही माहिती खालापूर पोलीस ( Khalapur Police ) यांना देण्यात आली. यावेळी मृतदेह खोल दरीत असल्याने अनेक संस्थांनी एकत्रित मोहीम राबवत मृतदेह बाहेर काढला. अपघातग्रस्त पथक आणि सहज सेवा पथक, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, यशवंती हॅकर्स पथक, तसेच खालापूर अग्नीशमन दल यांच्या साहायाने दरीमध्ये उतरून मृतदेह काढण्यात आला. या संस्थाना मृतदेह बाहेर काढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले.

मृतदेहाची ओळख पटली - दरीमधून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात यश आले आहे. ती व्यक्ती हैदराबाद येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास खालापूर पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details