महाराष्ट्र

maharashtra

'सीएए आणि एनआरसीबाबत मुख्यमंत्र्यांनी लोकांचे मत जाणून घ्यावे'

By

Published : Feb 22, 2020, 8:05 PM IST

Updated : Feb 22, 2020, 8:34 PM IST

सीएए आणि एनआरसीबाबत जनतेची मते मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतली पाहिजेत, असे वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी केले.

Tushar gandhi comment on CM Uddhav thackery
तुषार गांधी

पुणे - उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. याची जाणीव ठेवून त्यांनी एनआरसी, एनपीआर, सीएए या कायद्यांबाबत राज्यातील लोकांचे काय मत आहे हे समजून घेतले पाहिजे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने भूमिका मांडायला हवी असेही ते म्हणाले. तसेच नागपूरला एक भाषा, दिल्लीला एक भाषा तर मुंबईत दुसरी भाषा अशी आमची भूमिका नसल्याचे म्हणत तुषार गांधींनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजित 'Knowing Gandhi' या कार्यक्रमात तुषार गांधी बोलत होते. यावेळी खासदार कुमार केतकरही उपस्थित होते. यावेळी बोलताना केतकर म्हणाले की, किमान समान कार्यक्रमावर एकजूट असेल तर सरकार पडायचे कारण नाही. पण काही लोकांनी आग्रह धरला नाणारचा प्रश्न महत्वाचा आहे, तर सरकार पडू शकते. मनसे बांगलादेशींना शोधण्याच काम करत आहे. हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. त्यांच्यावरच कारवाई व्हायला हवी, असेही केतकर यावेळी म्हणाले.

हात्मा गांधी यांचे पणतू आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी

उद्धव ठाकरे हे एनआरसी, सीएए, एनपीआर यावर आपली बदलेली भूमिका सांगत आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेतेही एनआरसी, सीएए, एनपीआर आणि 370 च्या बाजूने बोलले असल्याचे केतकर म्हणाले. तसेच शिवसेना हा कायम भगव्या आघाडीत होता. त्यांना वेगळ्या पद्धतीने समजून सांगावे लागेल, असेही केतकर म्हणाले.

Last Updated : Feb 22, 2020, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details