महाराष्ट्र

maharashtra

Pune Accident News : पुण्यात हिट अ‍ॅंड रन! पीएमपीएल बस चालकानं दारुच्या नशेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवलं, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 12:10 PM IST

Updated : Oct 22, 2023, 1:07 PM IST

Pune Accident News : पुण्यात हिट अ‍ॅंड रन सारखा प्रकार समोर आलाय. बस चालकानं दारुच्या नशेत 10 ते 15 वाहनांना उडवलंय. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Pune Accident News
Pune Accident News

पीएमपीएल बस चालकानं दारुच्या नशेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवलं

पुणे Pune Accident News :पुण्यात हिट अ‍ॅंड रन सारखा प्रकार समोर आलाय. शहरातील सेनापती बापट रोड, वेताळबाबा चौकात पीएमटी बस चालकानं दारू पिऊन दहा ते पंधरा गाड्यांना उडवलय. या बसमध्ये तब्बल 50 प्रवाशी होते. दारूच्या नशेत चालकानं बस मागील दिशेनं चालवत सुमारे 10 ते 15 गाड्यांना उडवलंय. या बसचालकाविरोधात शहरातील चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निलेश सावंत असं या बसचालकाचं नाव आहे.

मोठी दुर्घटना टळली : वारंवार अशाप्रकारच्या घटना घडत असल्यानं पुण्यातील पीएमपीएल प्रशासनावरसुद्धा आता याला शिस्त लावण्याची वेळ आलीय. सुदैवानं या घटनेत बसमधील प्रवाशांना कुठली हानी झाली नाही. यावेळी अनेक नागरिकांनी वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बसच्या मागे किंवा पुढे जाऊ नका, अशी विनंती केली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. मात्र, बस मागे घेताना ज्या गाड्यांना उडवलं त्या गाड्याचं मोठं नुकसान झालंय. तसंच या गाड्यातील काही नागरिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. कृष्णा जाधव या व्यक्तीनं या पीएमपीएल बसची काच फोडून ही गाडी थांबवली. या पीएमपीएल बसच्या पाठीमागे जवळपास बऱ्याच मोठ्या लांबपर्यंत गाड्यांची रांग लागली होती. जर ही गाडी थांबवली नसती, तर यामध्ये अनेकांचे बळी जाण्याची शक्यता होती. त्यामुळं पीएमपीएल प्रशासन यावर काही उपाययोजना करणार की, थोड्या दिवसांनी संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होणार हे पहावं लागेल.

बसचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल : चतुशृंगी पोलिसांनी या बस चालकाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेत अटकही केली आहे. कृष्णा जाधव या तरुणाच्या सतर्कतेमुळं आणि धाडसामुळं अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. गर्दीच्या ठिकाणी चतुशृंगी मंदिर असून नवरात्र उत्सवात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकपायी सुद्धा चालत असतात. त्यामुळं या घटनेत अनेकांचे प्राण वाचले असंच म्हणावं लागेल.

हेही वाचा :

  1. Training Aircraft Crashed : प्रशिक्षण देणारं विमान पुन्हा कोसळलं; पायलट जखमी, नागरिकांमध्ये परसरली दहशत
  2. Jalna Accident : भरधाव ट्रॅक्टरनं दुचाकीला चिरडलं; पेट्रोल भरायला जाणाऱ्या बाप लेकासह तिघांचा मृत्यू
  3. Yamuna Expressway Accident : यमुना एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू
Last Updated : Oct 22, 2023, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details