महाराष्ट्र

maharashtra

Pimpri Chinchwad Police suspended : चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत त्रुटी, पिंपरी चिंचवडचे सात पोलीस हवालदारांसह तीन अधिकारी निलंबित

By

Published : Dec 11, 2022, 9:25 AM IST

Updated : Dec 11, 2022, 12:47 PM IST

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात वादग्रस्त शब्द वापरल्याने त्यांच्यावर शाईफेक झाली होती. यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सात पोलीस हवालदार आणि तीन अधिकाऱ्यांना ( Pimpri Chinchwad Police suspended seven police constables ) निलंबित केले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे :

पोलीस हवालदारांसह तीन अधिकारी निलंबित

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सात पोलीस हवालदार ( Pimpri Chinchwad Police suspended seven police constables ) आणि तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले, आम्ही या घटनेच्या संदर्भात सात पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ते सर्व मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षेचा भाग होते, असे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ( Throw Ink Against Controversial Statement ) सांगितले.

तीन अधिकारी, सात कर्मचारी निलंबित :पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिचवड पोलिसांनी महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेप्रकरणी (Throw Ink On Chandrakant patil ) तीन अधिकारी आणि इतर सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रविवारी दिली. डॉ.बी.आर.आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल मंत्री पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी शहरात ही घटना घडली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते : शनिवारी दुपारी मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी शेकडोंचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजप पदाधिकारी मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी ते चहा पाण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने तोंडावर शाई फेकली. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील हे पडता पडता वाचले. यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना गटाने देखील कार्यक्रम स्थळाच्या जवळच आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चळवळीतून मोठा झालो :मी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेतो. मी शर्ट बदलून कार्यक्रमाला गेलो. त्या वक्तव्यावरून मी तीन वेळेस स्पष्टीकरण दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. मी कार्यकर्त्यांच्या घराघरात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करा म्हणून त्यांच्या आई- वडिलांना सांगितले. त्या चंद्रकांत पाटलांच्या मनात अनादर आहे? अन तुम्ही शाई फेकणार? तुम्ही आंबेडकर यांचे पुस्तक, एक पान तरी वाचले आहे का? पुढे ते म्हणाले की, रोहित पवारांना (Rohit Pawar) बाबासाहेब आंबेडरकर वाचून माझ्याकडे यायला सांगा. मी वाचलेत बाबासाहेब. रोहित पवार तुझ्यासारख्या राजकीय परंपरेने नाही, तर चळवळीतून मोठा झालो आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Last Updated : Dec 11, 2022, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details