महाराष्ट्र

maharashtra

Corona Crisis : बूस्टर डोससाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद

By

Published : Dec 30, 2022, 5:16 PM IST

कोरोनाच भयावह संकट ( Corona crisis ) असलं तरी बूस्टर डोससाठी ( Corona booster dose ) नागरिकांचा अल्प प्रतिसाद ( Little response of citizens to Corona booster dose ) मिळत आहे. पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) जिजामाता रुग्णालयात नागरिकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली आहे.

Corona Crisis
बूस्टर डोससाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद

बूस्टर डोससाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद

पिंपरी- चिंचवड -परदेशात कोविडची ( Corona crisis ) परिस्थिती गंभीर असल्याचं चित्र आहे. भारतात देखील या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्यास केंद्र सरकारने सांगितलं असून प्रत्येकाने मास्क वापरण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अनेक शहरात बूस्टर डोस ( Corona booster dose ) घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. परंतु, पिंपरी- चिंचवड ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) शहरात मात्र याउलट चित्र आहे. बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद ( Little response of citizens to Corona booster dose ) आहे. असे पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेच्या जिजामाता रुग्णालयात पाहायला मिळालं आहे.

बूस्टर डोस मोफत -पिंपरी- चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात नागरिकांना बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरातील बहुतांश नागरिकांचा दुसरा डोस झालेला आहे. परंतु, परदेशात वाढत असलेला कोरोना पाहून केंद्राने ज्या व्यक्तींनी बूस्टर डोस घेतलेला नसेल त्यांनी घ्यावा आणि मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. यामुळं बूस्टर डोस घेण्यासाठी काही शहरात गर्दी आहे.

लस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद -पिंपरी- चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अल्प प्रतिसाद आहे. दिवसभरात केवळ 10 ते 15 नागरिक लस घेण्यासाठी येत असल्याच परिचारिका सांगतात. तर, कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक परत जात असून ती उपलब्ध झाल्यास त्यांना फोन करून बोलावून घेत असल्याचे देखील यांनी परिचारिका यांनी सांगितलं आहे. कोरोनाच संकट बघता गर्दीच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने मास्क वावरावे. असे आवाहन महानगर पालिकेच्या रुग्णालया मार्फत करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details