महाराष्ट्र

maharashtra

पुण्यातील आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

By

Published : May 21, 2020, 2:42 PM IST

पुणे पोलीस दलातील 25 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 25 पैकी 12 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून 11 जणांवर उपचार सुरु आहेत तर एकूण 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

corona infected police died
पुणे पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे- पुण्यातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे 9 मे रोजी पोलीस कर्मचाऱ्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यात आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे पोलीस दलातील 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 कर्मचारी आतापर्यंत बरे झाले आहेततर 11 कर्मचाऱ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वीच एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details