महाराष्ट्र

maharashtra

Builder beaten to death: क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत न दिल्याने बांधकाम व्यवसायिकाला मारहाण करून खून

By

Published : Nov 23, 2022, 9:30 PM IST

पुण्यातील क्रिकेट बेटिंगमध्ये (cricket betting) हरलेले पैसे परत दिले नाही, म्हणून बेटिंग घेणाऱ्यानीं 32 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करून खून (Construction businessman beaten to death) केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी 16 नोव्हेंबरला संकेत रामचंद्र अंनबुले याचं एका चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी के के मार्केट जवळील एका गाड्यांमध्ये संकेत रामचंद्र अंनबुले याला बेदम मारहाण केली. Construction businessman murder Pune, latest news from pune, pune crime

Construction businessman beaten to death
संकेत रामचंद्र अंनबुले

पुणे : पुण्यातील क्रिकेट बेटिंगमध्ये (cricket betting) हरलेले पैसे परत दिले नाही, म्हणून बेटिंग घेणाऱ्यानीं 32 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाला बेदम मारहाण करून खून (Construction businessman beaten to death) केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. Construction businessman murder Pune, latest news from pune, pune crime

हत्या करणाऱ्याला अटक

व्यावसायिकाला गाडीत कोंबून मारहाण-16 नोव्हेंबर ला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या के.के मार्केट जवळ ही खुनाची दुर्दैवी घटना घडली आहे. खुनाच्या ह्या घटनेत संकेत रामचंद्र अंनबुले या बांधकाम व्यवसायिकाचा मृत्यू झाला आहे. लहू माने, विशाल अमराळे आणि त्याचे इतर काही साथीदारांनी मिळून मयत संकेत रामचंद्र अंनबुले यांचे अपहरण करून खून केला आहे. कोरोना साथीच्या काळामध्ये मयत संकेत रामचंद्र अंनबुले हे कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्याना क्रिकेट बेटिंग करण्याे व्यसन लागले होते. क्रिकेट बॅटिंग जिंकण्यासाठी तो लहू माने आणि विशाल अमराळे यांच्याकडे क्रिकेट बेटिंग लावायचा. यातच त्याच्यावर जवळपास 28 हजार रुपयांची उधारी झाली होती. ही उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी 16 नोव्हेंबरला संकेत रामचंद्र अंनबुले याचं एका चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी के के मार्केट जवळील एका गाड्यांमध्ये संकेत रामचंद्र अंनबुले याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत संकेत रामचंद्र अंनबुले हा गंभीर जखमी झाला होता.

मारहाणीनंतर केली सुटका, झाला मृत्यू-संकेत रामचंद्र अंनबुले हा पैसे देत नसल्याने. आरोपींनी त्याच्या वडिलांन कडून गुगल पे वर 28 हजार रुपये वसूल केले होते. पैसे वसूल केल्यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या संकेत रामचंद्र अंनबुले याची सुटका केली होती. मात्र संकेत घरी गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी लहू माने विशाल अमराळे आणि इतर काही आरोपी विरोधात कुणाचा गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details