महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar Reply Sanjay Raut : खुर्ची एक असेल तर दोघांनी...; अजित पवारांचा टोला

By

Published : Aug 12, 2023, 4:45 PM IST

Updated : Aug 12, 2023, 5:12 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे अशी टीका केली होती. यावर अजित पवार यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता टीका केली आहे.

Ajit pawar on sanjay Raut
अजित पवार आणि संजय राऊत

पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान अजित पवार म्हणाले की, "एकाला वाटत आहे की, दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहे का? खुर्ची एक असेल तर दोघांचा डोळा तिथे ठेवून कसे काय चालणार आहे. ती खुर्ची भरलेली आहे, त्यावर व्यक्ती बसलेला आहे."

विरोधी पक्ष नेत्यांना लगावला टोला : मुख्यमंत्री हे तब्यतेच्या कारणाने आजच्या कार्यक्रमाला आले नाहीत. अलीकडे ज्या बातम्या येत आहेत की, रुसून गेले, फुगून गेले अशी चर्चा सुरू आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली कामे चालू आहेत. त्यांच्या एका बाजूला देवेंद्र फडणवीस होतेच दुसरी बाजू मोकळी होती आत्ता मी तिथे जाऊन उभा आहे. आत्ता आम्ही दोघे त्यांच्या बाजूला उभे आहोत. यात चुकले काय? जर राज्याचा विकास होत असेल आणि केंद्रातून पैसा देत असतील तर का घ्यायचा नाही. का राज्याचा सर्वांगीण विकास करायचा नाही. राज्याला आत्ता कोठे विरोधीपक्ष नेता भेटला आहे. त्यात त्यांना कोठे कोल्ड वॉर दिसत आहे, असा टोला अजित पावर यांनी विरोधीपक्ष नेत्यांना लगावला आहे.


चांदणी चौकाचा लोकार्पण सोहळा : अनेक शहरांच्यामध्ये रिंगरोड झाले आणि या सगळ्याची जबाबदारी गेली अनेक वर्षे नितीन गडकरी यांनी उचललेली आहे. त्यापूर्वीसुद्धा युतीच्या काळामध्ये पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून त्यांनी पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे केला आहे. देशातील जनता पुण्याची जनता जे चांगले काम करतात त्यांचा विसर कधी पडू देत नाही आणि पुणेकरांच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचे असणाऱ्या चांदणी चौक फ्लायओव्हरचे लोकार्पण होत असताना, आपल्याला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो, असे पवार म्हणाले. या चौकातून इथून जाणाऱ्या येणाऱ्यांनी सहनशीलता दाखवली. मुख्यमंत्री हे पण एकदा इथल्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि नंतर लगेच त्यांनी त्याच्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती. म्हणजे या चांदणी चौकाने कोणाला सोडले नाही. जवळपास सगळ्यांना कमी अधिक प्रमाणामध्ये याचा त्रास झाला आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Sedition Law : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवणाऱ्या देशद्रोह्यांना वाचवण्यासाठी कायदा रद्द केला का, संजय राऊतांचा सवाल
  2. Ajit pawar Press Conference : आमची विचारधारा शाहू-फुले-आंबेडकरवादीच; विकासासाठी सरकारमध्ये सामील-अजित पवार
  3. Ajit Pawar Metro Ride : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात मेट्रो सफर, पाहा व्हिडिओ
Last Updated :Aug 12, 2023, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details