महाराष्ट्र

maharashtra

अमेरिकन जीवनपद्धतीमुळे तरुणांमध्ये कर्करोगाच्या प्रमाणात वाढ

By

Published : Feb 27, 2021, 5:40 PM IST

सरकार कर्करोगासंदर्भात बरीच पावले उचलत आहे. पण, तरीही हा एक भयंकर आजार म्हणून समोर आला आहे. वास्तविक कर्करोगाचे रुग्ण आणि कर्करोगाच्या मृत्यूची आकडेवारीदेखील बरीच भयावह आहे.

cancer in young people
कर्करोगाच्या प्रमाणात वाढ

पुणे- कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. सरकार कर्करोगासंदर्भात बरीच पावले उचलत आहे. पण, तरीही हा एक भयंकर आजार म्हणून समोर आला आहे. वास्तविक कर्करोगाचे रुग्ण आणि कर्करोगाच्या मृत्यूची आकडेवारीदेखील बरीच भयावह आहे. भारतात दर तासाला कर्करोगाने अनेक मृत्यू होतात. आपण देशात जी अमेरिकन जीवनपद्धती अवलंबली आहे, त्यामुळे तरुणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

पुणे

कोणकोणते कर्करोग होतात
स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग, फुफ्फुसंचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, थायरॉइडचा कर्करोग यासारखे प्रकार सामान्यता महिलांमध्ये सर्वात जास्त आढळतात. तर पुरुषांना फुफ्फुस, प्रोस्टेट, कोलोरेक्टल, पोट आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका असतो.
70 टक्के कर्करोग हा जीवन पद्धतीशी संबंधित
देशात सर्वाधिक कर्करोगाचे प्रमाण हे तंबाखू खाणे, धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे यात आहे. 40 टक्के भारतातील जो कर्करोग आहे, तो डायरेक्ट तंबाखूशी संबंधित आहे. दुसरा प्रकार येतो लठ्ठपणा. लठ्ठपणा हा शहरीकरणामुळे वाढत चाललेला आहे. या लठ्ठपणामुळे 13 प्रकारचे कर्करोग होतात. लठ्ठपणामुळे आपले फॅक्टसेल वाढल्याने कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढत जाते. 70 टक्के कर्करोग हा जीवन जगण्याच्या पद्धतीशी संबंधित असल्याने आपण काय खातो, कसे राहतो यावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे आपण अमेरिकन जीवन पद्धती सोडून भारतीय पद्धतीच अवलंबली पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ कर्करोगतज्ञ डॉ. मिनेश जैन यांनी दिली.
कोलान कर्करोगात 2030 पर्यंत 125 टक्क्यांनी वाढ
जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास कोलन कर्करोग तिसऱ्या क्रमांकावर येतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, विशेषता पाश्चात्त्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्या मानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु, हल्ली ज्या-ज्या देशांमध्ये पाश्चात्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे. त्यात या देशांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. 2030 पर्यंत एकशे पंचवीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता डब्ल्यूएचओनो दर्शविली आहे. हा कर्करोग कधीच तरुणांमध्ये होत नव्हता, पण आता प्रमाण वाढत चालले आहे. तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 20 ते 25 वयाच्या मुलींमध्ये कर्करोग वाढत आहे.
प्रोस्टेट कर्करोगात पुणे दुसऱ्या क्रमांकावर
प्रोस्टेट कर्करोगाबाबत पुरुषांमध्ये पुणे दुसऱ्या क्रमाकांवर आहे. 5 ते 9 लाख पर इयर हे प्रमाण आहे. अमेरिकेत याच प्रमाण 110 लाख पर इयर आहे. अमेरिकन जीवन पद्धती घेऊन आपण तेथील आजारही मोठ्या प्रमाणात घेत आहोत. म्हणूनच प्रोस्टेट कर्करोग पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच स्तनांचा कर्करोग ग्रामीण भागात 70 लोकांमध्ये एकाला होतो. शहरात 19 पैकी 1, युकेमध्ये 10 पैकी 1 आणि अमेरिकेत 8 पैकी 1 महिलेला होतो. पण आपले असेच राहणीमान राहिले तर थोड्याच दिवसात आपण अमेरिकेला गाठणार आहोत, अशी माहिती ही यावेळी डॉ. जैन यांनी दिली.
रुग्णालयात कर्करोगाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ
2010 नंतर कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वी रुग्णालयात फक्त एक रेडिएशन मशीन पुरेसी व्हायची, पण आता तर 4 - 4 मशीन कमी पडत आहेत. एवढेच नव्हे तर पाहिले खूप कमी खाटा या रुग्णांना रुग्णालयात लागत होत्या. पण आता तर 70 हुन अधिक खाटा कमी पडत आहेत. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे आणि अशीच परिस्थिती राहिली तर आपण जगात पहिल्या क्रमांकावर येऊ अशी भीती आहे.
नियमित व्यायाम आवश्यक
सध्या प्रत्येक जणच धावपळीचे आयुष्य जगत आहे. या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या शरीराला वेळ न देता जास्त वेळ काम आणि पैशांना देत असल्याने आपणच आपल्या शरीराला वेळ देत नसल्याने अनेक आजारांना आपण स्वतः हा निमंत्रण देत आहोत. आपण दरोरोज 30 ते 40 मिनिटे नियमित व्यायाम केला पाहिजे. योगा, सायकलिंग, चालणे असे व्यायाम आठवड्यातून 5 दिवस तरी नियमितपणे करायला हवे. नाहीतर या अमेरिकन जीवनशैलीने आपण कोणतेही सेवन जरी केले नाही तरी कर्करोगाला आमंत्रण देऊ, म्हणून व्यायाम हा केलाच पाहिजे, असा सल्लाही यावेळी डॉ. जैन यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details