महाराष्ट्र

maharashtra

निवडणुकीत प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळायला हवे; उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Jan 2, 2022, 2:57 PM IST

जोपर्यंत प्रत्येक घटकाला त्यांचे प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नयेत. जेव्हा निवडणुका होतील त्यावेळी एस.सी, एस.टी ओबीसी आणि ओपन या सर्वांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हा त्यांचा हक्क आहे, असे पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी होत असणाऱ्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती- न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्य सरकारने विरोधी पक्षाला विचारात घेऊन विधिमंडळात निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, असा एकमताने ठराव करण्यात आला आहे. जोपर्यंत प्रत्येक घटकाला त्यांचे प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नयेत. जेव्हा निवडणुका होतील त्यावेळी एस.सी, एस.टी ओबीसी आणि ओपन या सर्वांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हा त्यांचा हक्क आहे, असे पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ( Pune District Central Bank Election ) होत असणाऱ्या मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

निवडणुकीत प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळायला हवे

आरोग्य विभागाला सूचना -

वाढत्या कोरोना व ओमीक्रॉन रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून वेळोवेळी आरोग्य विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड आदींची क्षमता वाढविण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला सक्षम करण्याकरता अनेक ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालये मंजूर करण्यात आली असून त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या व दुसऱ्या लसीकरण संदर्भात पवार म्हणाले की, पहिल्या डोसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दुसऱ्या डोसबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी हर घर दस्तक अभियान राबवले जात असून, या अभियानांतर्गत तपासणी केली जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details