महाराष्ट्र

maharashtra

नालासोपारा येथे रेल्वे रुळावरून पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह मिळाला

By

Published : Sep 7, 2019, 8:21 PM IST

मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसर जलमय झाला होता. यामुळे लोक वाहून गेल्याने अनेक पोलीस ठाण्यात मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातच एक युवक वसई रेल्वे स्थानकावरुन नालासोपारा स्टेशन रेल्वे ट्रॅक पकडून जात असताना अचानक पाय घसरून नाल्यात पडल्याची घटना घडली होती. शुक्रवारी त्याचा मृतदेह वसंत नगरी येथे सापडला. पोलिसांनी मृतदेहाची पटवल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर मनीष सिंह (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत मनिष सिंह

पालघर : वसई-विरारमध्ये बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात रेल्वे बंद ठेवण्यात आली होती. यावेळी रेल्वे रुळावरून चालत येत असताना पाण्यात वाहून एकाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी वसंत नगरी येथे मिळाला. तर या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नालासोपारा येथे रेल्वे रुळावरून पाण्यात बुडून मृत्यू, मृतदेह मिळाला

हेही वाचा -मुख्यमंत्रीपदाबाबत रामदास कदमांचे वक्तव्य निरर्थक - गिरीश महाजन

मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसर जलमय झाला होता. यामुळे लोक वाहून गेल्याने अनेक पोलीस ठाण्यात मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातच एक युवक वसई रेल्वे स्थानकावरुन नालासोपारा स्टेशन रेल्वे ट्रॅक पकडून जात असताना अचानक पाय घसरून नाल्यात पडल्याची घटना घडली होती. शुक्रवारी त्याचा मृतदेह वसंत नगरी येथे सापडला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर मनीष सिंह (३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

हेही वाचा -दिल्ली पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा केला फर्दाफाश, १२ जणांना अटक

तो नालासोपारा पूर्वेकडील अलकापुरीमध्ये आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. तो मुंबईतील आंतरराज्यीय एयरपोर्टजवळ सहारा पेट्रोल पंपावर काम करीत होता. नेहमीप्रमाणे संध्याकाळी घरी येताना वसईला उतरले होते. नालासोपाऱ्यात पाणी असल्याने ट्रेन बंद असून मी चालत येत असल्याचे त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले होते. मात्र, अर्ध्या तासानंतर त्याचा फोन स्वीच ऑफ झाला आणि त्यामुळे त्यांची मिसिंगची तक्रार वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तर शुक्रवारी त्यांचा मृतदेह वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.

ABOUT THE AUTHOR

...view details