महाराष्ट्र

maharashtra

Union Minister Gadkari orders : पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाका - केंद्रीय मंत्री गडकरींचे आदेश

By

Published : Aug 9, 2023, 12:09 PM IST

नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला अवघे तीन महिने झाले असतानाच, पहिल्याच पावसात पुलावर खड्डे पडले आहेत. पुलाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारींवर खा. राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावर त्यांनी सबंधित पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तत्काळ काळया यादीत टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ( Union Minister Gadkari orders )

Nitin Gadkari and Rajendra Gavit
नितीन गडकरी आणि राजेंद्र गावित

पालघर : पालघर - मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला तीन ते चार महिने पूर्ण झाले आहेत मात्र पुलावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आहेत. या मुद्यावर खा. राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यावर 'कामाच्या गुणवत्ते बद्दल जराही तडजोड केली जाणार नाही असे सांगत नितीन गडकरी यांनी सबंधित पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला तात्काळकाळया यादीत टाकण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खासदार गावित यांच्याकडून रस्त्यावरील इतर समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले. त्यांनी सांगितले की, नव्या वर्सोवा पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडून जवळपास ६८ ठिकाणी पुलावर सळया बाहेर आल्या आहेत. खड्डे पडल्याने तासन तास वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नवीन पुल असताना खड्डे कसे असा प्रश्न जनता विचारत आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असून पुलाची मिरा भाईंदर व ठाण्याहून वसईकडे जाणारी एक मार्गिकेचे याच वर्षी मार्च महिन्यात खुली करण्यात आली. पुलावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामाची चौकशी करावी त्याच बरोबर यात जो कोणी दोशी आहे. त्यावर कारवाई करावी अशी मागणी करत गावित यांनी एक निवेदनही दिले.

गडकरी यांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला. तसेच याबाबत अधिकाऱ्यांकडे नाराजीही व्यक्त केली.'याप्रकरणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करा. त्याला काळया यादीत टाका. अशा ठेकेदाराला पुढचे टेंडर घेऊ देऊ नका. विकास कामे होत आहेत. त्या कामात क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तडजोड नको' असे गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगत करवाईचे आदेश दिले आहेत.

विकासकामे होत असताना मी स्वतः विकासकामांचा दर्जा चांगला ठेवण्याबाबत प्रयत्न करतो व आग्रही असतो,आग्रही आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनीही लक्ष ठेवणे आवश्यक आहे असेही गडकरी म्हणाले. त्याचबरोबर वसई विरार पालघर जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असा शब्दही नितीन गडकरी यांनी खासदार गावित यांना दिला.मुंबई अहमदाबाद हायवेवर रुग्ण वाहिका, क्रेन, अग्नि शमन वाहन , एक फिरता दवाखाना, हायवे जवळ ट्रॉमा केअर सेंटर अशा सर्व सुविधा असणे आवश्यक आहे याकडेही खासदारांनी लक्ष वेधले.

ABOUT THE AUTHOR

...view details