महाराष्ट्र

maharashtra

कौतुकास्पद, भारतातील सर्वात लहान सीआयएओ महाराष्ट्रातून, पखरुडमधील पूजा चव्हाणची गवसणी

By

Published : Jul 20, 2022, 4:00 PM IST

pooja chavan
pooja chavan ()

भूम तालुक्यातील पखरुड येथील पूजा चव्हाण या तरुणीची चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर या पदी नियुक्ती झाली आहे. केवळ एकविसाव्या वर्षी तिने हे यश संपादन केले ( pakhrud pooja chavan is ciso officer ) आहे.

भूम ( उस्मानाबाद ) -भूम तालुक्यातील पखरुड येथील पूजा चव्हाण या तरुणीची चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर या पदी नियुक्ती झाली आहे. केवळ एकविसाव्या वर्षी तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे देशातील सर्वात कमी वयाची अधिकारी होण्याचा मान तिला मिळाला ( pakhrud pooja chavan is ciso officer ) आहे.

पूजा चव्हाण हीचे वडील पखरुड येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भूम शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या परिवाराने पखरुड गावतून भूम येथे आपले वास्तव केले. त्यामुळे पूजाचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण भूम येथील हायस्कूल येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण शंकरराव पाटील येथे पूर्ण केले.

त्यानतंर पूजाने सायबर सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत ती यशस्वी झाली. तिची उस्मानाबाद येथे दोन वर्षांपूर्वी सायबर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु, हार न मानता पूजाने आपली पुढील अभ्यास सुरु ठेवला. यातही तिने नेत्रदीपक यश मिळवले. तिची चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे. वयाच्या 21व्या वर्षीची इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर म्हणून निवड झालेली ही पहिलीच विद्यार्थिनी आहे.

पूजाला सन 2022 मध्ये देश पातळीवरील सावित्रीबाई फुले किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. जिद्द आणि संघर्षाच्या जीवावर पूजा चव्हाण हिने सर्वात कमी वयाची अधिकारी होण्याचा मान मिळवला. खरंतर ही गोष्ट इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.



हेही वाचा -Melghat School Issue : अकोल्याच्या संस्थेची मेळघाटात आगळीवेगळी 'सेवा'; 14 शाळांचे स्वीकारले पालकत्व

ABOUT THE AUTHOR

...view details