महाराष्ट्र

maharashtra

सिन्नरमधील ऑक्सिजन उत्पादक कंपन्या अधिग्रहित करा, समीर भुजबळांचे आवाहन

By

Published : Apr 11, 2021, 1:45 PM IST

नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला असून रोज पाच ते सहा हजार पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली असून बेड अपुरे पडत आहेत. व्हेंटिलेटर बेड रुग्णांना मिळेना झाले असून ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

सिन्नरमधील ऑक्सिजन तयार करणार्‍या कंपन्या
सिन्नरमधील ऑक्सिजन तयार करणार्‍या कंपन्या

नाशिक - कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे सिन्नर एम.आय.डी. सी मधील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेल्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित कराव्या, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक...

नाशिक शहर व जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला असून रोज पाच ते सहा हजार पाॅझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली असून बेड अपुरे पडत आहेत. व्हेंटिलेटर बेड रुग्णांना मिळेना झाले असून ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा-

मागील आठवड्यात जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ८५ मेट्रिक टन होती. तर जिल्ह्याची गरज ६५ मेट्रिक टन इतकी होती. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला असून आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ते बघता सिन्नर औद्योगिक वसाहतीतील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेल्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित कराव्यात, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details