महाराष्ट्र

maharashtra

नाशिक वनविभागाने घडवली बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट...

By

Published : Aug 16, 2019, 8:04 PM IST

निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर हा धरण परिसरात असल्याने इथे मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर आहे. अशातच प्रतापराव पुंड यांच्या शेतात सावजाच्या शोधामध्ये पाच महिन्याचा बिबट्याचा बछडा विहिरीत पडला होता. वनविभागातर्फे त्यास रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले.

बिबट्या

नाशिक - निफाड तालुक्यातील गाजरावाडी भागातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचविले. त्यानंतर वनविभागाने अथक प्रयत्न करत या बछड्याची त्याच्या आईशी भेट घालून दिली, हा सर्व प्रकार लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

नाशिक वनविभागाने घडवली बिबट्याच्या बछड्याची आईशी भेट


निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर हा धरण परिसरात असल्याने इथे मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर आहे. अशातच प्रतापराव पुंड यांच्या शेतात सावजाच्या शोधामध्ये पाच महिन्याचा बिबट्याचा बछडा विहिरीत पडला होता. वनविभागातर्फे त्यास रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, बिबट्याच्या मादीचा गाजरवाडी परिसरातील शेतकर्‍यांना त्रास नको म्हणून त्या बछड्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावर त्या पिल्लाला एक खड्डा खोदून त्यावर जाळी ठेवण्यात आली, बाजूच्या काही अंतरावर एका पिंजऱ्यात वनविभागाचे कर्मचारी बिबट्यावर लक्ष ठेऊन होते.


गेल्या ३ दिवसांपासून वनविभागाचे पथक पिल्लाला मादीकडे देण्यासाठी झटत होते. मात्र, रोज मध्यरात्री घटनास्थळी येऊन बिबट्याची मादी परत जात होती, परंतु पिल्लास नेत नव्हती. तसेच पिल्लू मोठे असल्याने ते सोडून देणे देखील धोकादायक होते. त्यामुळे, ह्या बछड्याला त्याच्या आईच्या ताब्यात कसे देता येईल याबाबत वन विभागाने नियोजन केले. अखेर ३ दिवसापासून ताटातूट झालेल्या बिबट्याच्या मातेची आणि बछड्याची भेट घडवून आणण्यात वनविभाग यशस्वी ठरले.


यावेळी अधिकाऱ्यांनी लावलेल्या कॅमेऱ्यात बिबट्या स्पष्ट होत नसल्यामुळे, पहिल्यांदाच वनविभागातर्फे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात यशस्वीरित्या कैद करण्यात वनविभागाला यश आले.

ABOUT THE AUTHOR

...view details