महाराष्ट्र

maharashtra

खासदार संजय राऊत आणि केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. पवार आज नाशकात; राऊतांचा अचानक दौरा

By

Published : Aug 28, 2021, 9:46 AM IST

सेना-भाजपा
सेना-भाजपा ()

केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार शहरात जनआशीर्वाद यात्रा करणार आहेत. तर संजय राऊत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दोन्ही पक्षातील राड्यामुळे अगोदरच राजकीय वातावरण तापलेले असताना भूकंपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या नाशकात हे दोन्ही नेते असल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. तसेच राऊत यांच्या अचानक ठरलेल्या नाशिक दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नाशिक- केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण राज्यमंत्री डाॅ.भारती पवार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे दोन्ही नेते आज नाशिक शहर दौर्‍यावर आहेत. डाॅ. पवार शहरात जनआशीर्वाद यात्रा करणार आहेत. तर संजय राऊत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. दोन्ही पक्षातील राड्यामुळे अगोदरच राजकीय वातावरण तापलेले असताना भूकंपाचे केंद्रबिंदू ठरलेल्या नाशकात हे दोन्ही नेते असल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. तसेच राऊत यांच्या अचानक ठरलेल्या नाशिक दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सेना-भाजपातील राड्यानंतर राऊत नाशिककडे रवाना

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांची जनआशिर्वाद यात्रा दुपारी तीन वाजता पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होईल. त्यापार्श्वभूमीवर शहर भाजपाने बैठक घेत यात्रेची जोरदार तयारी केली आहे. तर सेना नेते खासदार संजय राऊत शुक्रवारी रात्री नाशिककडे रवाना झाले. खासदार राऊत यांच्या अचानक ठरलेल्या दौऱ्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. राणे प्रकरणावरुन सेना-भाजपातील राड्यानंतर राऊत नाशिकमध्ये येत असल्याने वातावरण तापले आहे. सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. खासदार राऊत कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details