महाराष्ट्र

maharashtra

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी: जिल्हा रुग्णालयात सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय

By

Published : Jul 25, 2019, 5:40 PM IST

नाशिक शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी होती. ती मागणी राज्य सरकारने पूर्ण केल्याने वैद्यकीय क्षेत्राने स्वागत केले आहे.

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

नाशिक- नाशकात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. परंतू वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय करावी, अशी मागणी होत होती. ही मागणी राज्य सरकारने पूर्ण केल्याने वैद्यकीय क्षेत्रात या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

जिल्हा रुग्णालयात सुरू होणार वैद्यकीय महाविद्यालय

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल भाग आहे. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत असतात. नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याने या आदिवासी लोकांना सुद्धा याचा फायदा होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खरेतर राज्यात पहिल्यांदाच एखाद्या जिल्हा रुग्णालयमध्ये एमएस आणि एमडी पदाची पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होतील. तसेच रुग्णांना मोठ्या प्रमाणात मोफत सुविधा आणि उपचार भविष्यात मिळणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिकमध्ये अखेर अनेक वर्षांनंतर का होईना वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details