महाराष्ट्र

maharashtra

Sushma Andhares Allegation : राज्यातील गुन्हेगारी वाढण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार; सुषमा अंधारे यांचा आरोप

By

Published : Nov 27, 2022, 9:21 PM IST

देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृह, वित्तसारख्या (Ministry of Home Affairs and Ministry of Finance) अनेक महत्त्वाची आणि अर्थपूर्ण खाती त्यांच्याकडे आहेत. नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी वाढण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे (Devendra Fadnavis responsible for increasing crime) बोलत आता तरी नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस यांनी स्वतंत्र गृहमंत्री द्यावा (Sushma Andhare demand for separate Home Ministers), असे आवाहन सुषमा अंधारे यांनी केले. latest news from Nashik, Nashik Crime

Sushma Andhares Allegation
सुषमा अंधारे

नाशिक :देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्याकडे ६ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गृह, वित्तसारख्या (Ministry of Home Affairs and Ministry of Finance) अनेक महत्त्वाची आणि अर्थपूर्ण खाती त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपमध्ये दुसरा कोणी आमदार, कार्यक्षम नाही की फडणवीस यांनाच सत्तेचा मलिदा खायचा आहे? असा सवाल शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला. नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी वाढण्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे (Devendra Fadnavis responsible for increasing crime) बोलत आता तरी नाशिकसह राज्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी फडणवीस यांनी स्वतंत्र गृहमंत्री द्यावा (Sushma Andhare demand for separate Home Ministers), असे आवाहन त्यांनी केले. latest news from Nashik, Nashik Crime

स्वतंत्र गृहमंत्री देण्याची सुषमा अंधारेंची मागणी

भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे :शिवसेना प्रवकत्या सुषमा अंधारे यांची कृषीथॉन प्रदर्शनापूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आजचा दौरा अनौपचारिक आहे. नाशिक जिल्ह्यात महा प्रबोधन सभा त्यासाठी येणार आहे १६, १७, १८ डिसेंबर रोजी येणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, टीका करत नाही कुटुंबात काय चुकलं हे विचारण्याचा बहीण म्हणून अधिकार आहे. भाऊ किती उर्मट झाले हे माध्यमे बघत आहे. भाजपच्या वळचणीला गेल्या नंतर त्यांचे संस्कार हिन झाले आहे. गुलाबराव पाटील यांचा माज तसेच अब्दुल सत्तार यांची भाषा बदलली. किरीट सोमय्या यांनी कागदपत्रे काढून काहीच मिळत नाहीये. त्यामुळे सोमय्या यांना एखादं मंत्री पद द्यावे असेही अंधारे यांनी या वेळी सांगितले आहे...रामदेव बाबा यांच्यासोबत अमृता वहिनी होत्या, त्या काहीही बोलल्या नाही .मी असते तर तिथेच खडसावले असतेकाही लोक स्वतंत्र मराठवाडा मागणी करत आहेत्यांची मागणी पूर्ण होणार नाही,ही भाजपची पिलावळ आहे..


नीतू ,नीलू प्रचंड आघाऊ :उद्धव साहेब घरी बसायचे असा आरोप विरोधक करतात; पण आमचे एकनाथ भाऊ मंत्रालयात पण जात नाही ते सतत गणपती, नवरात्र, आणि पितृ पक्षासाठी जेवायला जातात त्यातून वेळ मिळाला की ते हात दाखवायला जातात. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने राणे कुटुंब अस्वस्थ झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुलांना चांगले संस्कार दिले नसल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळेच आपला नीतू आणि नीलू प्रचंड आघाऊ झाले आहेत. त्यांना आता तरी राणे यांनी काही वेळ काढून शिकवण द्यावी असेही आवाहनही अंधारे यांनी केला. एकीकडे महिलांना फक्त धक्का लागल्याने गुन्हा दाखल होतो. तर नाशिकमध्ये मुलीवर अत्याचार होऊनही राज्य शासन ठोस कारवाई करत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्र आज कोणत्या वळणावर चालला आहे याचा जनतेनेच विचार करावा असे ही अंधारे म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details