महाराष्ट्र

maharashtra

Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवार श्रद्धास्थान, प्रेरणास्थान; त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात - अजित पवार

By

Published : Jul 15, 2023, 11:27 AM IST

Updated : Jul 15, 2023, 1:15 PM IST

महायुतीच्या आमदारांमध्ये कुठेही कटुता न राहण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जो काम करतो तोच चुकतो व जो काम करत नाही तो चुकत नाही. त्यामुळे मी काम करणारा माणूस आहे. राजकारण राजकारणाच्या जागी आहे, तर परिवारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी शुक्रवारी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यावेळी कुठल्याही इतर राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Etv Bharat
Etv Bharat

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद

नाशिक -शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहेत. त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात आताही आहेच. तसेच मी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते. तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या. तेथे राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री सिलव्हर ओक गाठले होते. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते.

एनडीएच्या बैठकीला जाणार-उपमुख्यमंत्री अजित पवार हे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मोदींनी अनेक निर्णय घेतले आहेत. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिला की आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. सध्या फक्त चर्चा सुरू आहे. येत्या १८ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाणार आहे. एनडीएच्या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल हजर राहणार आहोत. त्यावेळी दुष्काळाबाबत आम्ही चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

विरोधकांना डिवचले -विरोधी पक्षनेता निवडीवर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेता हा अधिवेशनावेळी निवडला जातो. तसेच तो निवडीबाबतचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आहे. तसेच विरोधी पक्षनेत्याचे नाव हे विरोधकांना विधानसभा अध्यक्षांना द्यायचे असतात. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबतचा प्रश्न विरोधकांना विचारा, असे अजित पवार म्हणाले.

परिवाराला महत्व - शुक्रवारी काकींचे (प्रतिभा पवार) ऑपरेशन झाले होते. मला भेटायला थोडासा विलंब झाला होता. सुप्रियाने सिल्व्हर ओकवर बोलावले होते. त्यामुळे मी काकींना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, भारतीय संस्कृतीत परिवाराला महत्व आहे. शरद पवारपण तिथे होते. इतर कुठलीही चर्चा त्यावेळी झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, भेटीदरम्यान शरद पवार यांनी मला एक पत्र दिले आहे. शिक्षण विभागाबाबत ते पत्र होते. त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar Vande Bharat Express : अन् अजित पवारांनी केला वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास; पाहा व्हिडिओ
  2. CM Eknath Shinde : नवीन मित्र आल्यानंतर थोडी कुजबुज होते, मात्र....: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  3. Ajit Pawar At Silver Oak : बंडखोरीनंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या घरी, जाणूून घ्या भेटीमागचे कारण
Last Updated : Jul 15, 2023, 1:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details