महाराष्ट्र

maharashtra

Children Trafficking Case Nashik: 'त्या' 60 मुलांची तस्करी नाहीच! लोहमार्ग पोलीस व 'आरपीएफ'चा उताविळपणा

By

Published : Jun 3, 2023, 11:04 PM IST

चार दिवसांपूर्वी लोकल न्यूज चॅनेलपासून ते राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनेलवर मनमाड, भुसावळ व नाशिक येथून दाखवण्यात आलेल्या मानव तस्करीच्या सर्व बातम्या खोट्या सिद्ध ठरल्या आहेत. काल व आज भुसावळ व मनमाड या दोन्ही ठिकाणी त्या 60 बालकांच्या नातेवाईकांनी येऊन याबाबत खुलासा केला आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्या मुलांवर व मौलानावर अन्याय करून मुलांना बालसुधारगृहात व मौलानांना जेलमध्ये टाकले आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

Children Trafficking Case Nashik
'आरपीएफ'चा उताविळपणा

मुलाच्या भावाची प्रतिक्रिया

नाशिक (मनमाड):याबाबत सविस्तर वृत्त असे की, दानापुर-पुणे या रेल्वे गाडीतून मौलाना बिहारमधून जवळपास 60 मुलांना घेऊन सांगलीच्या मदरशात जात होते. येथे जाण्यासाठी त्यांनी सर्वांचे तिकीट आरक्षित केले होते. मात्र याच गाडीतून कोणीतरी खोडसाळपणा किंवा हेतुपुरस्सर ट्विट करून मुलांची तस्करी सुरू असल्याची तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच भुसावळ डिव्हिजनमधून भुसावळ या रेल्वे स्थानकावर 29 मुलांना उतरवून घेण्यात आले. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता थेट मानव तस्करी करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मौलानाना 12 दिवसांची कोठडी:या प्रकरणात आणखी काही मुले असल्याचे सांगून मनमाडला या मुलांना उतरवून घ्या व गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले. मौलानाना 12 दिवसांची कोठडी देण्यात आली तर मुलांना नाशिकच्या बालसुधारगृहात सोडण्यात आले. हा सर्व प्रकार समजताच बिहार येथील मुलांच्या पालकांनी मनमाडला व भुसावळला धाव घेउन आम्ही आमच्या स्वखुशीने आमच्या मुलांना मदरशात पाठवले असल्याचे सांगितले. ज्यांनी खोटी तक्रार केली त्याच्यावर व आरपीएफ व लोहमार्ग पोलिसावर गुन्हा दाखल करावा व आमच्या सारख्या गरिबांना का त्रास देतात याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. एकूणच काय तर आजही कायद्याचा दुरुपयोग करण्यात येत असुन विशिष्ट पद्धतीने देशातील वातावरण गढूळ करण्याचे काम सरकारी यंत्रणा मार्फत करण्यात येत आहे.

गुन्हा दाखल करण्याची अतिघाई?भुसावळ डिव्हिजनमधील भुसावळ व मनमाड ही स्थानके महत्वाची आहेत कोणत्याही प्रकारची घटना घडू नये म्हणून सीसीटीव्ही यासह कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र अनेक प्रकरणात गुन्हा घडला असला तरी या दोघांकडून गुन्हा नोंद करण्यात येत नाही. राजकीय किंवा वरिष्ठांना विचारून कधी गुन्हा दाखल होतो तर कधी होत नाही; मात्र या प्रकरणात कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता आरपीएफ विभागाने गुन्हा दाखल करण्याची तसदी घेतली. हीच घाई आता विभागाच्या अंगलट येणार आहे.


गरीब असल्याने ऐकून घेतले नाही:आम्ही ज्या ठिकाणी राहतो तेथे खूप गरीब परिस्थिती आहे. आमच्या मुलांना आम्ही शिक्षण देऊ शकत नाही. यासाठी आम्ही एनजीओ मार्फत आमच्या मुलांना सांगली येथे मदरशात पाठवले होते. मात्र पोलिसांनी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करून घेत आमच्या मुलांना व मौलानाना बालसुधारगृह व जेलमध्ये पाठवले. कदाचित आम्ही गरीब होतो म्हणून आमचे ऐकले नाही. दोषींवर गुन्हा दाखल करावा, असे प्रकरणातील मुलाचा भाऊ अली रिजवान यांनी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details