महाराष्ट्र

maharashtra

ऐकावं ते नवलच! नंदुरबारमध्ये 6 लाखांच्या 'केसांची चोरी'

By

Published : Jan 11, 2020, 5:08 PM IST

नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात राहणाऱ्या सलीम खाटिक यांचा महिलांच्या डोक्याचे केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. गोळा केलेले केस ते कोलकत्ता आणि चेन्नई येथील कारखान्यात पाठवतात.

Hair Theft In Nandurbar City
नंदुरबार शहरात केसांची चोरी

नंदुरबार -शहरातील सलीम खाटिक यांचा महिलांच्या डोक्याचे केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये दीड क्विंटल केस साठविले होते. तेच केस चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले.

नंदुरबार शहरात केसांची चोरी...

हेही वाचा... सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण

नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात राहणारे सलीम खाटिक यांचा महिलांच्या केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात फिरून गोळा करून आणलेले केस कोलकत्ता आणि चेन्नई येथील कारखान्यात विक बनवण्यासाठी पाठवले जातात. केस कारखान्यात पाठवण्यासाठी, ते गोण्यामध्ये भरून ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी रात्री गोडाऊन फोडून केस भरलेल्या गोण्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

हेही वाचा... 'रॉ'चा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक

सलिम यांच्या घराच्या तळ मजल्यावर गोदाम असून गोदामाचा कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोदामातील तीन गोणपाटात भरलेले 150 किलो वजनाचे केस, तसेच 250 किलो वजनांची स्टिलचे ताटे, असा एकुण 6 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

हेही वाचा... साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन

सलिम खाटीक गोदाम उघडण्यासाठी गेले असता गोदामाचे कुलूप त्यांना तुटलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, केसांचे तीन गोणपाट व स्टिलची ताटे चोरीला गेली होती. केस चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सलिम खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नंदुरबार - आज पर्यंत आपण अनेक वस्तू चोरीला गेल्याचे आपण ऐकल असेल पण नंदुरबार शहरातील सलीम खाटिक यांचा महिलांचे केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी आपल्या गोडाऊन मध्ये दीड क्विंटल केस साठविले होते ते चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्याची किमत सहा लाख रुपये या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले ....
नंदुरबार शहरातील पटेलवाडी परिसरात राहणारे सलीम खाटिक यांचा महिलांचे केस विकत घेण्याचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात फिरून ते गोळा करून आणलेलं केस कोलकत्ता आणि चेन्नई येथील कारखान्यात विक बनविण्यासाठी पाठविले जातात. केस कारखान्यात पाठविण्यासाठी केस गोण्या मध्ये भरून ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी रात्री गोडाऊन फोडून केस भरलेल्या गोण्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.Body:नंदुरबार शहरातील पटेलवाडी येथील रहिवासी सलिम जुम्मा खाटीक यांच्या महिलांचे डोक्याचे केस खरेदी करण्याचा व्यवसाय आहे. सलिम खाटीक यांच्या घराच्या तळ मजल्यावर गोदाम असून गोदामाचा कडीकोंडा तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. गोदामातील तीन गोणपाटात भरलेले 150 किलो वजनाचे केस तसेच 250 किलो वजनाचे स्टिलचे ताट असा एकुण 6 लाख 50 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. सलिम खाटीक गोदाम उघडण्यासाठी गेले असता गोदामाचा कडीकोंडा त्यांना तुटलेला दिसला. आत जावुन पाहणी केली असता केसांचे तीन गोणपाट व स्टिलचे ताट चोरीला गेले होते. केस चोरी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सलिम खाटीक यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Conclusion:byte-सलीम खाटिक,
केसांचे व्यापारी
byte सुनिल नंदवाळकर
पोलीस निरीक्षक,नंदुरबार शहर पोलीस स्टेशन

ABOUT THE AUTHOR

...view details