ETV Bharat / state

साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन

author img

By

Published : Jan 11, 2020, 11:27 AM IST

निसर्गाची अवकृपा आणि शासकीय धोरणे कशी शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहेत याची अनेक उदाहरणे कवितांमधून दिली गेली. सोमेश कुलकर्णींनी जगाचा पोशिंदा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे गुणगान आपल्या कवितेतून केले.

osmanabad
साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन

उस्मानाबाद - साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात कवी कट्ट्याने झाली. या कवी संमेलनात कवींनी शेतकऱ्यांची व्यथा आणि सध्याची शासकीय व्यवस्था तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांवर कविता सादर केल्या. यावेळी सर्व कवींचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

साहित्य संमेलन : कवी कट्ट्यात शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन

या कवी संमेलनात चैत्राली जोगळेकर यांनी प्रत्येक वयोवृद्धात मला आपले बाबा दिसत असल्याचे सांगून घरात आणि समाजात वडिलांचे काय महत्त्व आहे हे पटवून दिले. घराला वृक्षाप्रमाणे सावली देणारा बाबा प्रत्येक घरात गरजेचा असतो. प्रत्येक वयोवृद्धात दिसतो एक बाबा म्हणत त्यांनी सर्वांना भावनिक केले. तर स्वप्नील कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांची व्यथा आपल्या कवितेतून मांडली.

हेही वाचा - ...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री!

निसर्गाची अवकृपा आणि शासकीय धोरणे कशी शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहेत याची अनेक उदाहरणे कवितांमधून दिली गेली. सोमेश कुलकर्णींनी जगाचा पोशिंदा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे गुणगान आपल्या कवितेतून केले. शासकीय धोरणे सर्वसामान्यांच्या जीवनात कसे अडथळे ठरत आहेत हे सांगितले. जगाचा पोशिंदा असलेल्या आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला कधी विसरू नये असे आवाहन केले. दरम्यान, कवी कट्ट्यामध्ये सहभागी होण्यासाठी संबंध मराठवाड्यातून कवी दाखल झाले होते. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या कट्ट्यामध्ये विविध अंगाने कविता मांडण्यात आल्या.

Intro:कवी कट्ट्यात शेतकऱ्यांच्या व्यथा अन भ्रष्ट व्यवस्थेचे दर्शन
उस्मानाबाद : साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ ही कवि कट्ट्यानेच झाली. या कविसंमेलनात सर्व कवित्रीने शेतकऱ्यांची व्यथा आणि सध्याची शासकीय व्यवस्था तसेच सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे गुणगान करण्यावर होती. सर्व कवित्रीचा पुष्पगु देऊन सत्कार करण्यात आला.


Body:चैत्राली जोगळेकर यांनी प्रत्येक वयोवृद्धात मला आपले बाबा दिसत असल्याचे सांगून घरात आणि समाजात वडिलांचे म्हणजेच बाबांचे काय महत्व आहे हे पटवून दिले. घराला वृक्षाप्रमाणे सावली देणारा बाबा प्रत्येक घरात गरजेचा असतो.... प्रत्येक वयोवृद्धात दिसतो एक बाबा म्हणत त्यांनी सर्वांना भावनिक करून सोडले तर स्वप्नील कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली.... निसर्गाची अवकृपा आणि शासकीय धोरणे कशी शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहेत याची अनेक उदाहरणे दिली. सोमेश कुलकर्णी जगाचा पोशिंदा आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांचे गुणगान केले तर शासकीय धोरणे सर्वसामान्याच्या जीवनात कसे अडथळे ठरत आहेत हे सांगितले. जगाचा पोशिंदा असलेल्या आणि सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला कधी विसरू असे आवाहन केले.


Conclusion:कविकट्टामध्ये संबंध मराठवाड्यातून कवी दाखल झाले होते. सुमारे दीड तास सुरू असलेल्या या कट्ट्यामध्ये विविध अंगाने कविता मांडण्यात आल्या होत्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.