ETV Bharat / state

'रॉ'चा अधिकारी असल्याचे सांगून तब्बल 2 कोटींचा गंडा घालणाऱ्या तोतयाला अटक

author img

By

Published : Jan 11, 2020, 1:15 PM IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून 'रॉ'साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षित पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता.

2-cr-fraud-police-arrested-accused-abhijeet-pansare-in-aurangabad
2-cr-fraud-police-arrested-accused-abhijeet-pansare-in-aurangabad

औरंगाबाद- गुप्तचर संस्था 'रॉ'चा अधिकारी असल्याची थाप मारून अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अभिजीत पानसरे (रा.नाशिक) असे तोतया भामट्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले आहे.

हेही वाचा- 'निर्भया प्रकरणी दोषींच्या फाशीचे थेट प्रक्षेपण व्हावे'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून 'रॉ'साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षित पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता. औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांच्यासोबत अभिजीतची २०१६ मध्ये अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. त्यावेळी पानसरे याने आपण रॉचे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्याला 'न्युक्लियर रिएक्टर' तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे, असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.

दरम्यान, अभिजीत पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी २० ऑक्टोबर २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ या काळात २ कोटी ५० लाखांची गुंतवणूक पानसरे याच्या प्रकल्पात केली होती. त्यानंतर पानसरे हा वेळोवेळी गवळी यांना परतावा देण्यास टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर शरद गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याची थाप मारून अनेकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अभिजीत पानसरे (रा.नाशिक) असे तोतया रॉ च्या अधिकायाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र जप्त केले


Body:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षीत असलेला पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता. औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांच्यासोबत अभिजीत पानसरे याच्यासोबत २०१६ मध्ये अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती.त्यावेळी पानसरे याने आपण रॉ चे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्याला न्युक्लीयर रियाकटर तयार करण्याचे वंâत्राट मिळाले आहे असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.
दरम्यान, अभिजीत पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी २० ऑक्टोबर २०१६ ते १२ ऑक्टोबर २०१७ या काळात २ कोटी ५० लाख रूपयांची गुंतवणूक पानसरे याच्या प्रकल्पात केली होती. त्यानंतर पानसरे हा वेळोवेळी गवळी यांना परतावा देण्यास टाळाटाळ करीत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर शरद गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.