महाराष्ट्र

maharashtra

Grampanchayat Election 2022 : 'या' जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ३ हजार उमेदवार रिंगणात ; आजपासून प्रचाराचा धुराळा उडणार

By

Published : Dec 9, 2022, 10:10 AM IST

नांदेड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ३ हजार उमेदवार रिंगणात (Grampanchayat election 2022) आहेत. आजपासून प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सरपंच पदासाठी २५९ तर सदस्य पदासाठी ६५४ अशा ९१३ उमेदवारांनी माघार घेतली (nanded Grampanchayat election campaign start) आहे.

Grampanchayat Election 2022
ग्रामपंचायत निवडणूक 2022

नांदेड :ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ९१३ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, सरपंच पदासाठी ४६१ आणि सदस्य पदासाठी २ हजार ६२० असे ३ हजार ८१ उमेदवार अंतिमत: निवडणुकीच्या आखाड्यात उतरले (nanded Grampanchayat election) आहेत. आजपासून या ग्रामपंचायतींत प्रत्यक्ष प्रचाराचा धुराळा उडणार आहे. निवडणुकीच्या राजकारणही तापणार आहे.

व्यूहरचना आखली :निमित्ताने गाव पातळीवरील डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या १८१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झाला. तेव्हापासून निवडणुकीच्या निमित्ताने हालचाली वाढल्या होत्या. यंदाही थेट नागरिकांतून सरपंच पद निवडले जाणार असल्याने सरपंच पदाच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी होऊन ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी अनेकांनी व्यूहरचना आखली (nanded Grampanchayat election campaign start) आहे.


निवडणूक प्रतिष्ठेची :राजकीय पक्षांनीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत ७ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी होती. त्यामुळे ८ डिसेंबर रोजीच या निवडणकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. १८१ ग्रामपंचायतींमध्ये १८१ सरपंच निवडले जाणार आहेत. या पदांसाठी ४६१ उमेदवार आपले भविष्य अजमावत आहेत. त्याचप्रमाणे १,३९१ सदस्यांच्या जागांसाठी २ हजार ६२० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकंदर ग्रामपंचायतच्या या आखाड्यात ३ हजार ८१ उमेदवार शड्डू ठोकून असून गाव पातळीवरील राजकारण तापू लागले आहे. उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकंदर ग्रामपंचायतच्या या आखाड्यात ३ हजार ८१ उमेदवार तळ ठोकून असून गाव पातळीवरील राजकारण तापू लागले (Grampanchayat election campaign start) आहे.


उमेदवार निवडणूक :किनवट तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीमध्ये १६१ जागांसाठी ८०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण सध्या तापलेले आहे. याशिवाय माहूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ३६८. लोहा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींसाठी ४३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सरपंच पदासाठी २५९ तर सदस्य पदासाठी ६५४ अशा ९१३ उमेदवारांनी माघार घेतली (Grampanchayat election) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details