महाराष्ट्र

maharashtra

Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - दादा भुसे

By

Published : Jul 21, 2023, 9:12 PM IST

समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. गेल्या काही दिवसात या महामार्गावर झालेले अपघात लक्षात घेता, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्रवाशांनीही नियमांचे पालन करीत प्रवास करावा, असे आवाहन दादा भुसे यांनी केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री भुसे यांनी आज समृद्धी महामार्गावरील नागपूरच्या वायफड टोलजवळ प्रवाशांसोबत संवाद साधला.

Samriddhi Highway
Samriddhi Highway

दादा भुसे समृद्धी महामार्गाची पहाणी करतांना

नागपूर :काळजी करू नका, तुमची सुरक्षितता आमची जबाबदारी आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला आहे. त्यांनी आज समृद्धी महामार्गावरील नागपूरच्या वायफड टोलजवळ प्रवाशांसोबत संवाद साधला. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात लक्षात घेता अपघात रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा आज भुसे यांनी प्रत्यक्ष समृद्धी महामार्गावर जाऊन घेतला. त्यानंतर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला आहे.

प्रवाशांनीही नियमांचे पालन करावे :समृद्धी महामार्ग हा नागपूर, मुंबई या शहरांना जोडणारा अत्यंत महत्वाचा महामार्ग आहे. मात्र, गेल्या काही दिवसात या महामार्गावर झालेले अपघात लक्षात घेता, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी प्रवाशांनीही नियमांचे पालन करीत प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट तसेच वायफड टोलनाक्याची पाहणी करीत दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी समृद्धी महामार्गाची माहिती दादा भुसे यांना दिली. यात कंट्रोल रुम, वाहनाला आग लागल्यास आग प्रतिबंधात्मक सयंत्र, शीघ्र कृती दल वाहन, वाहनांची टोलनाक्यावर करण्यात येणारी तपासणी, प्रवाशांसाठीचे समुपदेशन केंद्र, ॲम्ब्युल्सची पाहणी केली. यावेळी मंत्रीमहोदयांना आग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.

नियम पाळणाऱ्यांना धोका नाही :यावेळी दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत संवाद साधला. कोल्हापूर येथून आलेल्या बाजीराव गवळी कुटुंबीयाचा समृद्धी महामार्गावरील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला. समृद्धी महामार्गावरून प्रवास करतांना निश्चित वेगमर्यादा पाळण्याची गरज आहे. नियम पाळणाऱ्यांना धोका नाही. नागपूरपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याची प्रतिक्रिया गवळी यांनी मंत्रिमहोदयांसमोर दिली.

समृद्धीवर शून्य अपघात : समृद्धी महामार्ग अविकसित भागाच्या समतोल विकासाचा राजमार्ग आहे. जगातल्या उत्तमोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून या महामार्गावर अपघात होणारच नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यात येईल, याकरिता प्रयत्न करण्यात येतील असे दादाजी भुसे म्हणाले.

हेही वाचा -​Buldhana Bus Accident : खासगी बस अपघातग्रस्तांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी - फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details