महाराष्ट्र

maharashtra

Nitin Gadkari Threat Case: नितीन गडकरी धमकी प्रकरण; दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन उघड

By

Published : Jul 17, 2023, 12:37 PM IST

Updated : Jul 17, 2023, 1:03 PM IST

नितीन गडकरी धमकी खंडणी प्रकरणातील आरोपी दहशतवादी अफसर पाशाचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी अफसर पाशाचा 'लष्कर-ए-तैयबा'सह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध आहे. सोबतच तो नागपुरातही वास्तव्यास होता, अशी धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.

Nitin Gadkari extortion case
नितीन गडकरी धमकी खंडणी प्रकरण

पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

नागपूर :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणामागील मास्टरमाईंड दहशतवादी अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगावच्या कारागृहातुन अटक केली. त्यानंतर त्याला शनिवारी नागपुर आणण्यात आले आहे. रविवारपासून अफसर पाशाची चौकशी सुरु आहे. यात त्याचे नागपूर कनेक्शन उघड झाले आहे. तो 2003 ते 2004 मध्ये नागपुरात वास्तव्याला होता. चौकशी दरम्यान तो धक्कादायक खुलासे करताना वारंवार उत्तरे बदलत असल्याची माहितीही पुढे आली आहे. एनआयएचे पथक देखील त्याची चौकशी करण्याची शक्यता आहे. 19 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अफसरवर बॉम्बस्फोटाचे आरोप :मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा 'लष्कर ए तोयबा'चा दहशतवादी आहे. तो 2014 पासून बेळगावच्या तुरुंगात होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेन वॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करून घेतला होता. अफसर पाशावर 2003 च्या ढाका आणि 2005 च्या बेंगलूरु बॉम्ब ब्लास्टचा आरोप आहे.

दोन वेळा धमकी :या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुर येथील जनसंपर्क कार्यालयात कर्नाटकातील बेळगाव कारागृहातुन जयेश पुजारी याने दोनदा धमकीचे फोन करून खंडणी मागितली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी नागपुरात दोन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने बेंगळुरू येथेही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता दहशतवादी अफसर पाशाचे नाव पुढे आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.


'पीएफआय'च्या संपर्कात :जयेश पुजारा उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यांनीच जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे तपासात पुढे आले आहे. अफसर पाशाने जयेशला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केले होते. या वृत्तास नागपूर पोलीस आयुक्तांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा :

  1. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणातील, अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात
  2. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना
  3. Nitin Gadkari Extortion Case : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए ऐवजी नागपूर पोलीस दाखल करणार जयेश पुजारीविरोधात आरोपपत्र
Last Updated : Jul 17, 2023, 1:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details