महाराष्ट्र

maharashtra

संघ मुख्यालयात प्रांत संघचालक राम हरकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

By

Published : Aug 15, 2021, 1:12 PM IST

Updated : Aug 15, 2021, 5:12 PM IST

अमृतमहोत्सवी वर्षात देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यात कोरोनाच्या काळात माहामारीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी नुकसान झाले आहे. कोरोना योद्ध्यांमुळे हे शक्य झाले आहे. या महामारीवर आपण मात करत विजय मिळवल्याने आता सर्वांचा आत्मविश्वास वाढला आहे, असे राजेश लोया म्हणाले.

Flag hoisting at RSS headquarters nagpur
सातत्य, कष्ट आणि आत्मविश्वासाने अशक्य ही शक्य - राजेश लोया

नागपूर - स्वातंत्र्य दिनी संघ मुख्यालयात विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे यांनी आज (रविवारी) ध्वजारोहण केले. सकाळी आठ वाजता हा ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया यांची उपस्थिती होती. यावेळी सुरक्षा सांभाळणाऱ्या सीआयएसएफ, क्युआरटीच्या जवानांनी सलामी दिली.

सातत्य, कष्ट आणि आत्मविश्वासाने अशक्य ही शक्य - राजेश लोया

'कोरोनावर विजय मिळवल्याने आत्मविश्वास वाढला'

अमृतमहोत्सवी वर्षात देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यात कोरोनाच्या काळात माहामारीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पण इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी नुकसान झाले आहे. अनेक कोरोना योद्ध्यांमुळे हे शक्य झाले आहे. या महामारीवर आपण मात करत विजय मिळवल्याने आत्मविश्वास आता सर्वांचा वाढला आहे. या माहामारीतही भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतचे सर्वाधिक पदके पटकवली आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सातत्य, कष्ट आणि आत्मविश्वास हे आपल्याजवळ असल्यास अशक्य ही शक्य होऊ शकते, असे म्हणत राजेश लोया यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

'आपला देश हा विविधतेत एकतेचा संदेश देणारा'

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी देशासमोर अनेक आव्हाने असणार आहेत. पण या आव्हानांना स्वीकारून पुढे आपल्याला जायचे आहे. ज्या काही अडचणी येतील त्यावर आपण सहजपणे मात करु कारण आपला देश हा विविधतेत एकतेचा संदेश देणारा आहे, असे महानगर संघचालक राजेश लोया यावेळी म्हणाले.

हेही वाचा -#IndiaAt75 : 'सबका साथ-सबका विश्वास, यासोबतच आता 'सबका प्रयास'; मोदींचा नवा नारा

Last Updated : Aug 15, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details